मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

माझ्या मना..

लोभ तुझाच होई मना
कसं सावरू रे पिया, 
माझ्या मना...
तुझ्या मोहाचा मोह 
वेड लावे जीवा
कसं सावरू रे पिया
माझ्या मना...
तुझी एक छबी नजरेस
धुंद गंध जणू दरवळे तनमना
कसं सावरू रे पिया 
माझ्या मना..
चूकवून तुझीही नजर 
रोखण्याची अदा
मोहवते पुन्हा पुन्हा मला
कसं सावरू रे पिया
माझ्या मना...
तुला हाक मारी कोणीतरी
न उगाच मी मोहरूनी वेडीपिशी
कसं सावरू रे पिया 
माझ्या मना...
अलिकडे,
अल्लड हा वारा छेडी
माझ्या हृदयीच्या ताना..
तुजवर जडला जीव
प्रीत माझी का उमगेना
कसं सावरू रे पिया
माझ्या मना...
तुझ्या मोहाचा मोह
लोभ तुझा मना
सारं वेड लावे जीवा
कसं सावरू रे पिया 
माझ्या मना...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...