Tuesday, April 14, 2015

दीपा, धनश्री, श्री, वीरेंद्र यांच्यासाठी


प्रिय,
तुम्हारे बगैर यहॉं कुछ भी रूका नही
मगर तुम्हारे साथ जो था वो सब छुट गया
हम तो कल भी भागते थे और आज भी
पर दौड में आवाज देती वो मुस्कुराहट कहॉं है
टिफन के बक्से से आज भी पेट भरता है
मगर तुम्हारे मिठीसे तकरारों का डिबा कही खो गया है
आज भी शामियाने लगते, जश्ने, मजे होते है...
अकेले तो नही हुए हम
पर साथ होने का एहसास कही रूठ गया...
तुम्हारे साथ जो था वो सब छुट गया


यंदाच्या वर्षी तुम्ही अलवारपणे आमच्यापासून दूर गेला खर,े पण दूर गेले असं तरी कसं म्हणायचं. मनात, आठवणीतील जागा एकदम घट्ट आहे. फेविकॉल का जोड ही समझलो.
माणसे असोत वा नसोत ‘सिस्टिम’सुरूच राहते, हे वाक्य कैकवेळा ऐकलेलं.   सिस्टीमला थांबणे ठाऊक नसते असं व्यवस्था ओरडून ओरडून सांगत असते.   खरचं असेल बुवा असं. व्यवस्थेला यंत्रणा कळते माणसे कुठे? पण आम्हाला तर माणसेच कळतात ना! मग आमचं काय?
खरतरं तुम्ही गेला तरी सगळं तसचं आहे, आजही १ ला मिटींग होते, विषय ठरतात, चर्चा होतात, दुपारी डबा खाणे होते, बातम्यांच्या अहवालाचे, केआरएच्या अहवालांचे येणे-जाणे असं सगळं तसचं आहे.
संध्याकाळच्या वेळी त्याच गडबडी, टकटक, बातम्यांची घाई, कम्प्युटरसाठी कधी मस्का लावणे तर कधी दुसºयाच डिपार्टमेंटमध्ये जाऊन बसणे. कधी बायलाईन आहे कधी बायलाईनमध्ये घोळ, कधी रूटीनचा ही कंटाळा तर कधी सिंगलचा मारा सगळं तसच्या तसंच.
त्यातच मग कोणाचा तरी बर्थ डे असतो, मग  केक कटींग होते,  भेळीवर सगळे तुटून पडतात आणि आजही पत्रकावर आपल्यापुरती भेळ घेऊन येणारे भेळप्रेमी ही आहेत. कधी कोणाकडून पार्ट्या काढणं कधी देणं असं ठरल्याप्रमाणे काटा किर्रची पंगत आहे. तुम्ही जाताना जसं होतं बेरीज-वजा करून आजही तसचं तसचं आहे आणि तरीही काही तरी ‘हरवले आहे’. तुम्ही. तुमचं नसणं खूप त्रासदायक आहे. वेळी-अवेळी येणाºया तुमच्या मैैत्रीच्या हाका मिसींग आहेत अन गमंत म्हणजे याची कुठेही तक्रार करता येत नाहीये!
वर्षाच्या सुरूवातीलाच लग्नगाठीसाठी दीपा बाहेर पडली तर करिअरसाठी वीरेंद्र, घर-घरच्यांसाठी धनश्री बाहेर पडली तर वर्ष संपताना, भविष्याच्या हाका ऐकण्यासाठी श्री. अवखळ वयान भट्टी जमलेल्या चमूतून एकेक मैतर गळायला लागलं तसं मन भरून यायला लागलयं. मोठं होण्याच्या धांदलीत, ‘दुनियादारी’ने पाय अगदी जखडून टाकलेत.  छोट्याश्या आयुष्यात हे ही हवं न ते ही. असं नाही ना होतं. तुमचं जाणं कळतयं...पण वळतं नाही ना मनाला त्याचं काय!   कधीतरी संध्याकाळच्या वेळी खूप एकटं वाटतं पर की करा..कुछ नही हो सकता ना! तुम्हांला सांगू का, यंदाची निवडणुकीची धामधूम सुनीसुनी होती, गणपतीचं कव्हेरज एकाकी, दिवाळी पोरकी अन वर्धापनदिन.....?   जाऊ द्या ना नकोच बोलायला ते!  पण तुमच्या आठवणीची अलवार पिसे मनावर आहेत...ती तशीच राहतील.... !!!!

(२८ डिसेंबरच्या लोकमत वर्धापनदिनानिमित्त निघणार्या इन हाउस रोखमत मध्ये लिहिलेले )

3 comments:

 1. कुणांच येणं आणि जाणं आपल्या हातात नसतंच ना ? तसं असतं तर खरंच किती छान झालं असतं ? पण, या सगळ्या जर तरच्या गोष्टी... आपल्या आवाक्याबाहेरच्या...

  " फुल खिलते है, लोग मिलते है
  कुछ लाेग, एक बार जो बिछड जाते है
  वो हजारोंके आनेसे मिलते नहीं ! "

  आपण फक्त जपून ठेवायी, आठवणींची अलवार पिसं.. मनाच्या कोपऱ्यात.. दुसरं काय करु शकतो आपण..

  ReplyDelete
 2. purani yaade or purane friends hamesh dil me hai....

  ReplyDelete

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...