रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

घरबंदी

 दोन दिवस झाले होते तिला गावी जाऊन. हाताला काही काम नव्हतं..म्हणजे घरात खूप कामं होती पण वाट्याला कुठलंच येत नव्हतं.. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत राबणाऱ्या बाया आधीच घरात होत्या.. कामाची शिस्त बिघडते नाय तर काम वाढते या सबबखाली कुठलं काम कुणी करूच द्यायचं नाही..काकूला तर ती लहानपणापासून पाहत आली होती..फार काय वय नाही तिचं पण कमरेत आता वाकलीये. मांस कुठे आहे कोणास ठाऊक नुसती हाडाची मोळी दिसते. हां पण कामाचा उरक जबर..तिच्या विशी पंचविशीतल्या लेकी ही तशाच कामाला dashing..कधीही जा घर लख्ख अन् कितीही पाहुणे येवोत कितीही कामं पडोत घर तसंच लखलखीत. झाडू, फरशी पुसणं, अन भांडी चमकवणं या कामाला दिवसातून किती वेळा करायचं हे काही ठरलेलं नाही..कितीही वेळा ते होत राहतं..

तिला मात्र तिच्या शहरी रुटिनपासून ब्रेक आणि हवा तसा श्वास घ्यायला बदल हवा होता. घरबंदीचा तिला उबग आला होता..रोज उठून घरचं, मुलाचं ऑफिसचं करून करून ती कंटाळली होती.. गावाकडचं शेतातल घर, घरासोमारची विहीर, द्राक्षांच्या बागा, भाजीपाल्याच्या छोट्या मोठ्या वाफा..निसर्गाचा सहवास तिला खुणावत होता..ऑनलाईन शाळेला..वर्क फ्रॉम होमला दिवाळीची सुट्टी मिळाली आणि तिने लगेच गावपाण्याची वाट धरली. पण आल्यापासून मिळालेला निवांतपणा तिला राहून राहून टोचत होता.
त्रासून ती घराच्या ओट्यावर बसली. धुणं धुणाऱ्या लहान बहिणीला पाहत..
'दीदी दुसरा कभी?'
'एकसेच हैराण हाय.. उत्ताच ब्बास.'
'ऐसा कैसा..पटापटा होणे देने का नई व्हय.'
'है तो तेरे दो..उसके..इस्के.. भै-भानांके बच्चे होते तो उशे भी साथ..'
'क्या बोलने का बई ये तरा..'
'भला सून तो मै जाके चपात्या करू क्या..कटाली देख बैठ बैठ के''
'नको रहंदे..यहा का आट्टा अलग रेहता..नै जमता तुम लोगोंको फिर चपात्या वातड होते..आन हुयाच तो.. नाष्टा हुया.. सालने हूये.. उधर चुल्ले के घर में रोट्या चले.. नन्हीे के बर्तना हुया की करती तो उने..'
'फिर हौर बर्ताना.. पोचा मारनेवाली क्या?'
'तो क्या वैसाच रखने का..वो हुया कि कनोले करने का.. तभी तुम आये कर के खेत के कामा नई निकाले..'
ती धुणं वाळवून घरात आली.. दोन दिवस हवापालट म्हणून तिचा भाऊ देखील आला होता. तोही हे सगळं पाहत होताच. सारखं कामात व्यग्र असणाऱ्या घरातल्या बायकांना पाहून चिडून पण काळजीनं म्हणाला, 'क्या सरिका सारिका कामा मे लगेले रहते..जरा आराम करते जाव..टीव्ही देखो..चूप बैठो.. निंद नाही आयी तो चूप लेटो..धुंड धुंड के, निकाल निकाल के कामा क्या करने का.. रह्या थोडा साफ करने का तो कुच्छ बिघडता नई.. इत्ते कामा नको करते जावू..'
तशी काकू वैतागली..'ऐसेच बाता करता अन् दिल दुखाता.. कामा रखे तो कोन करनेवाला है..धुंड धुंड के कामा करना नै पडता हम को, गंदा नई खपता जरा बी..हम को हमारे आदम्या के साथ खडा रहना पडता समज्या. छोऱ्या करते उनका कौतुक नई पर नामा रखने आता. फिर से मेरे छोऱ्या को कुछमत बोल.आन जांदे छोड आदम्यांको खाने बुला.' रागाने थरथतत काकू ताटं घेऊन बसली.. भाऊ गारद. गप वळला..ती मात्र त्यांच्या घरात नव्यानं आलेल्या गर्भवती सूनेकडे पाहत होती..तिच्या पोटाकडे पाहता पाहता एकदम कासावीस झाली..
…..
शिट म्यान..पुढच्या खेपेत बाळाला घेऊन ती देखील अशीच चटचट कामं करताना दिसेल..आता जरा अल्लड वाटणारी ही बाळंतपणानंतर पोक्त झालेली असेल..अन् आपण असच बघत राहू..डोळे असूनही नसल्यासारखे.. जसं आपल्याला कधीच दिसलं नाही.. की आपल्या लहान बहिणी कधीतरी लहानपणीच आपल्यापेक्षा मोठ्या झाल्या.. दुरावल्या, हरवल्या..कामाचं व्यसन घेऊन त्यात गुंगून गेल्या..शेतात कामं आहेत तर घरातली कमी करायची..का तीचती सतत करायची? ohhh म्यान...मानसशास्त्राच्या कुठल्या क्लृप्त्या वापरून ह्यांना सांगायचं की माणूस आहोत आपण..घड्याळाचे काटे नाहीत की थांबलो तर बंद पडू...त्यांच्या जीवतोड राबण्याच नाव घ्यायचं की त्यांना हलवून हलवून जागं करायचं.. कसं सांगायचं हे राबणं नाही झिजणंय..पण कस? का कळूनसमजून ही तोंड बंदच राहतं…का मी त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाहीये..का ते माझं ऐकणार नाहीयेत,अशी भीती वाटत राहते..व्यसनाधीन माणसाच्या नादी लागायचं नसतं असा अलिखित नियम इथ ही लागू असतो का?? उपयोग काय मला समजत असलेल्या गोष्टींचा..
'यत्ता सोचू नको..जरा कमी वाप्री तो क्या लगेच गंजता नई., चूप खा के ले..'काकूने ताट समोर ठेवलं..आणि ती काकूच्या तोंडाकडे पाहतच राहिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...