शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

पिरीयेडसचे कॅलेंडर

काय तो अवतार झालाय तुझा? स्वत:कडे लक्ष द्यावं थोडं. हाता-पायावर बघ केस किती वाढलेत आणि चेहरा किती काळवंडलाय. कितीदा म्हणायचं पार्लरला जा. आता काय त्याचं कॅलेंडर सेट करून देऊ? बरं, युट्युबवर पाहिलं तर घरबसल्याही हजार नुस्के मिळून जातील. पण काही करायचंच नसतं. कशात उत्साहच नाही. ती तुझी मैत्रिण बघ..हं हं तीच ती..काय मेकओवर केलाय..आणि ती..हो आलीच असेल तुझ्या लक्षात..कसली टकाटक असते...चॉईसच दमदार असते तिची. नाही तर तू, काही दम नाही तुझ्यात. कसं तुझ्या जवळ यायचं माणसानं..वरून रिझवण्याची एक अदा नाही तुझ्यात...! तू यंव..तू टँव..तू अमकं..तू तमकं..तूऽऽऽऽ तूऽऽऽऽ.. कुठल्या न कुठल्या पार्टीनंतर, गेट टुगेदर नंतर, सोशल मिडियातला भंपकपणा आवडल्यानंतर त्याची ही भुणभुण असायचीच! बोलून बोलून तो कंटाळला.. हळूहळू त्याचा आवाज हवेतूनही गायब झाला..

तशी ती घामेघूम होऊन किचन ओटा साफ करत स्वत:शी बोलू लागली, ‘सगळ्या अपेक्षा माझ्याकडूनच. हँ कटकट साला! मी मेकओवर केल्यानं, टकाटक राहिल्यानं आन काय ते रिझवल्यानं मला काय हवंय ते मिळणारे का? हट तेरी, ज्याच्याकडे ‘नजर’च नाही, त्याला कदर नाही! आणि कॅलेंडर सेट करायची हौसच असेल तर माझ्या पिरीयेडसचे कर..आधी ती रेग्युलरंय का इरेग्युलर हे माहित करून घे!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...