रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

खरं तर प्रेम हवं असतं!

 ती त्याच्यावरून बाजूला झाली आणि शांत पडून राहिली. किंचित थकली होती आणि तरीही सूखाचा क्षण अनुभवून सुखावली होती. त्याने मात्र उठून लगेच लाईटस ऑन केले. अस्सं भपकन डोळ्यांवर प्रकाश आलेला तिला अजिबात आवडत नव्हतं. पण नेहमीच त्यावर काय बोलणार? त्याने लाईटच्या बटणाकडे हात नेला तेव्हाच तिनं डोळे घट्ट मिटून घेतले. तिथली लाईट तशीच ठेवून तो बाथरूममध्ये गेला. बराच वेळ चूळ भरत राहिला. वाजवीपेक्षा जास्त वाहणार्या त्या वाहत्या नळाचा आवाज तिला इरिटेट करत होता. पण सांगायचं त्राण नव्हतं उरलं तिच्यात. कानावर उशी घेऊन गप्पच राहीली. मग त्याचं सगळं उरकून तो थेट हॉलमध्ये गेला. मोबाईलवर क्रिकेटची मॅच पाहत सोफ्यावर आडवा झाला. ती अजूनही तशीच उताणी होती. तिने चादर जवळ केली. एका कुशीवर झाली. खूप तहान लागली होती तिला..साखर ही हवी होती किंचिंत पण उठायचा कंटाळा आला होता म्हणून तशीच पडून राहिली. तो आता बेडरूममध्ये येणार नव्हता. थोड्याच वेळात त्याच्या घोरण्याचा आवाज येणार होता, सकाळच्या बिछाना चहाशिवाय तो उठरणारही नव्हता..हे सारं काही ठाऊक होतं तिला. ती धुसफूसत राहिली अन् स्वत:शीच पुटपुटली, ‘इतका रसरशीत शरीरसोहळा अनुभवून ही मला थोडंसं अटेन्शन, थोडंसं फ्लर्टिंग खरं तर प्रेम हवं असतं..हे कधी कळेल त्याला!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...