बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

सखे

मन घायाळ करून पाहिले
पाहिले तुझ्यापासून दूर राहून
मन बावरे तुलाच फितूर 
अन मी माझ्याही नकळत
तुझ्यासाठी आतुर

सखे तुझ्यासंगच हवे आयुष्य
हे श्वास सारे तुझ्याच नावे 
मी एकटा भणंग फकीर 
कोरूनी टाक हातावर माझ्या
तुझ्या सोबतीची लकीर 

काय उणे, काय बेरीज 
आयुष्य शून्य तुझ्याखेरीज 
प्रेमाशिवाय जगणं मुश्कील
तुझ्याशिवाय असणं अवघड
तूच माझ्या अस्तित्वाचा हुंकार
तू घे ना मज वेड्याला  
तुझ्यात सामावून अलवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...