शुक्रवार, ६ जुलै, २०१८

घर्षण

नेमकी लिफ्ट बंद होती. तिचे पाय आधीच लटपटत होते. आता चार मजले चढून जायचे. पाय गळून गेल्यासारखे झाले. त्याच्याकडे पाहिलं तर लिफ्ट बंद असल्यामुळे तोही किंचित वैतागला होता पण तिच्याइतका नाही. त्यानं प्रेमाने हात पुढे केला. तिनेदेखील हात दिला. एकेक पायरी मागे जात होती. तसा तिच्या हातांना कंप आणि घाम फुटत होता. तो मात्र कुल वाटत होता. लॅच उघडून दोघं आत शिरले आणि त्यानं आतून लॅच लावून दार पुन्हा बंद केलं. अगदी शिताफीनं. तिचेे श्‍वास वाढले होते. हृदयाची धडधड आणि शरिराची थरथर तिला एकदम जाणवू लागली होती. तो लॅच लावून वळला तसं त्यानं आवेगानं तिला मिठीत घेतलं. तिच्या गळ्यातली ओढणी बाजूला फेकून त्यानं मानेवर ओठ टेकले आणि तिच्या देहातील थरथरीचा वेग वाढला. मेंदू मात्र अफूची गोळी खाल्ल्यासारखा निपचित झाला. त्यानं दाराजवळच्या भिंतीवर तिला रेललं. तो अधिक जवळ आला. त्याच्या अंगाअंगाचा स्पर्श तिच्या शरिरात संथपणे झिरपत होता. आणि एकदम त्याचं ताठरलेलं लिंग तिच्या मांडीला स्पर्शून गेलं. त्या घर्षणाने  तिला काहीतरी विचित्र वाटलं आणि तिने त्याला मागे ढकललं.
‘काय झालं?’
‘आत्ता नको प्लीज.’ तिने त्याच्याकडे न पाहताच सोफ्यावर पडलेली ओढणी उचलली.
‘ओके. रिलॅक्स. पण तू इतकी नर्व्हस का झालीस.’
उत्तरात काय बोलावं न कळून ती कसनुसं हसली. काहीच झालं नाही असं खूणेनंच म्हणाली. तो तिच्या जवळ येऊन बसला तशी ती पुन्हा बेचैन झाली.
‘माझ्याकडून काही...मी खूप धसमुसळेपणा केला का? तुला पाहिल्यापासून वेडा झालो होतो गं. तुझा साधा हातही हातात घेता येत नव्हता. इतकी वर्ष मी कधी कुणाकडे असं पाहिलंही नाही. सतत कामात. पण लग्न ठरल्यापासून तुला किमान जवळून पहाव तरी वाटायचं. आज आमल्याने त्याच्या घरची चावी देऊन ठेवली...आणि मग’
‘आय डोन्ट नीड एनी एक्सप्लेनेशन. जस्ट लिव्ह इट फॉर नाऊ.’ तिचा नर्व्हसनेस कमी झाला नव्हता.
‘मी आवडतो तरी ना तुला..’
‘आत्ताच रजिस्टर मॅरेज करून येतोय आपण.’
‘दॅटस नॉट द पॉईंट. मी आवडतो ना तुला?’
‘आवडला नसतास तर सहा महिन्यांपूर्वीच सांगितलं असतं ना..’
‘मग? सॉरी, डोन्ट टेक मी रॉंग...पण तू आत्ता मला मागे ढकललंस तर त्यात एक झिडकार होता.. होता ना.’
‘अं..’ ती एकदम चपापली. त्याच्या डोळ्यांतला भाव तिला भेदत गेला. ‘मला कल्पना नव्हती की आपण इकडं कुठं येऊ. मे बी त्यामुळं...’
‘तू एक्सायटेड नव्हतीस मला भेटायला, स्पर्श करायला..’ त्याने तिच्या नजरेत नजर गुंतवून विचारलं. तिच्या हातांना भरपूर घाम होता. ओठ शिवल्यासारखे तिने मिटून घेतले होते. ‘मी फक्त कीस करणार होतो. बाकी काहीच नाही गं. एनीवे, अजून पंधरा दिवस आहेत आपल्या साग्रसंगीत लग्नाला. इथं, बेंगलोरमध्ये देवळात लग्न करायचं असलं की आधी लग्न रजिस्टर करून यावं लागतं म्हणून आज..त्याअर्थी आजची रात्र..’बोलता बोलता तो थांबला आणि त्याने पटकन तिच्या गालावर ओठ टेकले. तिच्याकडे न पाहता सोफ्यावरून उठला आणि म्हणाला, ‘निघूयात.’
ती निश्‍चलपणे बसून राहिली. त्याचा मूड घालवला का? हिरमोड केला का? शांतपणे त्याला मागे सारता आलं असतं ना..किंवा सांगताही..पण काय सांगायचं? तुझ्याशी इतक्यांदा बोलले, भेटले तरीही आज जेव्हा माझ्या मांडीला झालेलं ते घर्षण फार अवघड वाटलं...असं नाही की हे सारं कळत नाही. ते होणार याचीही कल्पना आहे. पण तरी ती घटिका जेव्हा अचानक समोर आली...रितसर जरी आली असती तरी कदाचित पहिल्यांदा तर काही वाटणारच ना...तो तर फक्त किस करणार होता आणि मी त्या स्पर्शानं काय काय विचार केला क्षणभरात...मी हे सांगायला हवं का? तो काय विचार करेल मग? स्पर्शातले रिलकटन्स न बोलता गळेल? ती बसूनच राहिली.
‘चलो, निघूयात.’
‘अं. तुला घाई नसेल तर थोडावेळ बसूयात. मला काहीतरी बोलायचंय...खरंतर सांगायचंय..’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...