शुक्रवार, ६ जुलै, २०१८

हरवणं

माझा फोन कुठाय? त्यानं निमूट मवाळपणे विचारलं.
नाही रे माझ्याकडे. एका मिनिटात पाच वेळा तू हेच विचारलं आणि मी तुला तेच उत्तर देत आहे.
खरंच नाही? ओके ठीक आहे.
ओके? अरे फोन सापडत नाहीये ना..इतका कुल कसा राहू शकतो. चल मी शोधायला मदत करते.
तो मोठ्याने हसला.. नको तुझी शोधण्याची मदत..खोटी खोटी मदत. त्यापेक्षा फोन दे.
पुन्हा तेच.
नाहीये ना..मग उरक काम.
हां मोठ्या लोकांची बातच और...अॅपलच्या फोनची ती काय किंमत.. भारी माज आहे.
माज नाही. अंदाज.. अंह पक्की खूणगाठ आहे..
कसला अंदाज..कसली खूणगाठ
ऑफिसातून बाहेर पडताना फोन मिळणार अन् तो तूच देणार...माझ्या वस्तू हरवतात..मला सापडत नाहीत तेव्हा त्या तुझ्याकडेच असतात. इट्स ऑलरेडी प्रुव्हण..
हे भारीये तुझं...तुझी कुठली वस्तू हरवली की तू आपलं माझ्याकडे बोट दाखवून मोकळा..हे असं सरळ माझ्याकडे येणार, जाब जवाब मागायला. उद्या कधी जर  तुझं मन हरवलं तर काय तेही माझ्याकडेच येणार शोधायला..
हट् तेव्हा तर तूच येशील ना माझ्याकडे, तुझं मन द्यायला..!!

तिने  त्याची नजर चुकवून गडबडीने  त्याचा  फोन डेस्कवर  ठेवला. सटकली.  पण चुकून स्वतःचा फोन तिथं विसरली त्यांचं काय..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...