मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

बेपर्दा होनेसे इश्क जरूरी

का अशी सितम करतेस? मला भेटल्यानंतर तरी चेहर्‍यावरचा नकाब बाजूला सारत जा, कितीवेळा म्हणालो तुला. तुझ्या मोमीन गल्ल्यांपासून बरचं दूर आहोत आपण. इथं कोण पाहणारेय तुला. उलट माझा जीव तरसतोय तुझ्या दीदारला नजमा.
नजमा नकाबच्या आत हलकेच लाजली. तिच्या लाजेचे सुरेख भाव तिच्या डोळ्यांतून त्याच्यापर्यंत पोहचले तसा तो अजूनच बेचैन झाला. तो पुन्हा विनवणीच्या सूरात म्हणाला, ‘नजमा, नकाब...
तिनं किंचित चुळबुळ केली. तिच्या नकाबातून डोकावणारे डोळे त्याच्या डोळ्यांशी भिडवत स्निग्ध कंठाने म्हणाली,‘रूबरू तर मलाही व्हावंसं वाटतं ना इम्रान. पर कंबख्त इस दुनिया को इश्कसेभी ऐतराज है और बेपर्दा औरतसेभी! इसवक्त बेपर्दा होनेसे इश्क जरूरी है!शेवटचं वाक्य उच्चारताना तिच्या आवाजाची धार वाढली.
त्याक्षणी इम्रानला नकाबमधूनही तिचे दीदार झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...