सोमवार, ४ जून, २०१८

सांज

सांजचा पिवळा धम्मक प्रकाश
संग बरसणाऱ्या  पाऊसधारा..
मातीत गंधाळलेला आकाश
अन् मी होई अलगद वारा
सख्या रे,आभाळलेली घटिका
चेतवी मन काया
तू ये धावुनी
मी आसुसलेली प्रिया
हा माहोल बघ सुहाना
रात समीप..
बाहेर काळोख तैनातीला
हा मोह मोहक क्षणांचा
तुझ्या ओठांतून फुलू दे
रंध्रा रंध्रात  माझ्या
पाझरू दे कणकण
झिरपू दे खोल खोल
मग उगव तू या काळजात
माझा बहर तुझ्या रोम रोमात
सख्या रे,
सांजचा पिवळा धम्मक प्रकाश
अन् मज वेडीला तुझा, तुझाच ध्यास..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...