शनिवार, २८ एप्रिल, २०१८

फिलिंग्स

काही माणसांशी आपल्याला मोकळं बोलता येतं पण कोणास ठाऊक का मोकळं वागता येत नाही..अगदी कृत्रिम नसतं काही पण सहजता ही नसते...एक विचित्र ऑकवर्डनेस असतो.. त्या माणसांविषयी आदर ही वाटत असतो, त्यांच्यासोबत छान ही वाटत असतं पण कंफर्ट नसतो काही केल्या..अशांविषयी आत्मीयता वाटत नसली तरी आपलेपणा असतो.. अंह..आपलेपणा ही नाही पण एक काही तरी असतो बुवा-कनेक्टवाला धागा, तरीही मुद्दा तोच सहजता नसते. म्हणजे दहा मिनिटं एकमेकांसमोर उभे राहिलो अन् आपलं म्हणणं संपल्यावर समोरचा जर बोलला नाही तर आपण क्षणभर ही ती पोकळी सहन करू शकत नसतो. ती फालतू का होईना बडबडीने भरत रहायला हवी असं वाटत राहतं...केवळ आपणच सहज - कंफर्टेबल नसतो की तशा समोरच्या व्यक्तीकडून रेंज मिळत असतात हे ही कळत नाही.. असं हे विचित्र त्रांगड का असतं..धड आपल्याला कृत्रिम होता येत नाही..धड सहज...! तिने त्यालाही विचारलं तुला होतं का असं..तो अडखळत म्हणाला, फक्त तुझ्यासोबत होत नाही...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...