मी मिटल्या पापण्या
तर तू असतेस समोर
कधी असंही व्हावं
तू असावीच समोर
कधी पुनवेच्या राती
दारात चांदणं खेळावं
त्या नेमक्या क्षणी
तुच चांदणं होऊन यावंस
कधी असंही व्हावं
तुझा एकांत तुला छळावा
माझ्या एकांताइतकाच
अन होऊन माझ्यासाठी अधीर
तू यावीस धीर सोडून...
माझ्या हृदयीची धडधड
कधी तुझ्या कानी पोहचावी
तुला स्मरण्याचा माझा विचार
तर तू अलवार समोर यावीस
हे किती अवघड आहे,
तुझ्याविषयी प्रेम वाटून
एकटं बिकटं राहणं..
तुझ्याविषयी ओढ वाटून
लपवत-छपवत राहणं
मग कधी असंही व्हावं,
हलकासा पाऊस असावा
वार्याची हळवी झुळूकही
रोमरोम उल्हसित काया
अन मनभरून उलघाल..
मी तुझ्या वाटेनं चालवं
अन तू अर्ध्या वाटेतच गाठावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा