शनिवार, ४ जून, २०१६

फिरकी


कॅन्टीनमध्ये बसल्या बसल्या त्याला तिची फिरकी घेण्याची हुक्की आली. चल, तुझी एक परीक्षा घेतो तो तिला असं म्हणाला आणि तिच्या हृदयात सळसळ झाली. कसली परीक्षा घेणार आहे हा...आज गाडी रूळावर कशी आली. असं काहीतरी ती विचार करत असतानाच तो पुन्हा म्हणाला, विचारू का प्रश्‍न?
हाय रे दिल तो जोरोंसे धडकने लगाती स्वत:शीच कुजबुजली. मग त्याच्याकडे बघत फक्त होकारार्थी मान डोलावली.
आपण तुझे ऑबझर्वेशनस् पाहू किती स्ट्रॉंग आहेत. सांग बर आपल्या वर्गात किती बेंच आहेत’- तो
हे खुदा ! हे विचारणारेय होय...ऑबझर्वेशन टेस्टतोंड वेंगाडत तिचा मनाशीच पुन्हा संवाद. तो बोल कीअसं तोंड करून तिच्याकडे पाहत होता.
असतील २५-३०
असतील नाही. नेमकं सांग किती?’
अम्मम..असतील २५चं. जा नाही सांगता येतं. तुला तरी माहितीये का?’
हो मग. २२ आहेत. आता सांग आपल्या लॉनवर किती बाकं आहेत?’
अलिकडची दोन, तिकडंचं एक, मग झाडापाशीचं हां एकूण ६ आहेत.
चूक. १०
प्रत्येक मजल्यावर किती वर्ग आहेत?’
असतील किती पण. मला काय करायचंयं. काही सांगितलं तरी तू चूकच म्हणणारेस. अन स्वत:चं ज्ञान पाजळणारेयसं. ते तू मी उत्तर न देता ही पाजळ आणि तूच सांग किती ते.ती एकदम वैतागली.
तसा तो सुरूच झाला,‘ यात काय इतकं वैतागायचंय गं. आजूबाजूला आपण डोळे उघडे करून नीट बघायला नको. अडीच वर्ष शिकतेयस अन वर्गातीलं बाकं सांगता येत नाहीत ? हाऊ सॅड! दिवसातले जास्त तास जिथे घालवते तिथल्या नोंदी मनाशी नकोतं? कसलीही धड ऑबझर्वेशन्स नाहीत. निरीक्षणं नाहीत, वाटायला छोटी वाटतात तरी ही महत्त्वाची स्किल्स आहेत. पुढे उपयोगी पडतात. तुला कळतयं का, तोंड गं काय करतेय.....त्याच्या लेक्चरबाजीला पंजा दाखवत तिने मध्येच थांबायला लावलं. तरी त्याने हात काय दाखवते म्हणून प्रश्‍न केलाच.
मग तिने रागातच गप्प राहण्याची खूण केली अन बोलू लागली, ‘ओ महत्त्वाची स्किल्स!! तूझं ऑबझर्वेशन कितीये ना कळलयं मला. दिवसातले बहुतेक तास जिथे असते ना तिथे मी फक्त अन फक्त तुलाच पाहत असते. तुझं निरीक्षण करत असते. तू साद घालीन म्हणून कानात प्राण फुंकत राहते. बारबार खो जाती हूँ तुममें, तुम्हे नही दिखा? तुझ्यावरून नजर हलेल तर मला बाकं, वर्ग, बेंचं दिसतील. मोठा आलाय ऑबझर्वेशनवाला! तुझ्या या टेस्टमध्ये मी फेल असले ना तर तूही पास नाहीये बरं का!
एवढं सगळं घडाघडा बोलल्यावर तिला एकदम सुटल्यासारखं झालं आणि तो मोठे डोळे करून तिच्याकडे पाहत राहिला...गुंतल्यासारखा!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...