सोमवार, २० जून, २०१६

खुल्या मैदानात...!

खुल्या मैदानात, 
काळीकुट्ट अंधारलेली रात्र
एकदम निवांत...
अन् मी हळूच, गुपचूप मोकळी!
खुल्या मैदानात,
जागोजागी सुसाट वारा
इकडं तिकडं 
अन माझी किंचित थरथर पोकळी!
खुल्या मैदानात,
मित्रमैत्रिणींचा धिंगाणा
अगदीच वेडा-बिडा
अन मी भीत भीतच सामिल
खुल्या मैदानात,
काजव्यांची मुक्त किरकिर
आसमंत भरून
अन माझ्या घाबर्‍या आवाजास किंकाळीचा फील
खुल्या मैदानात,
सारा नूरच निराळायं
सगळंचं मुक्तयं..
खेटलेली मने, मांड्यांना मांड्या
समोर शेकोटी, मागे तंबू
वर मोकळं आकाश, खाली जमीन
ही रंगलेली मैफिल, दंगलेले मित्रमैत्रिण 
मध्येच मिठ्यांची दाद-
हगींग अ‍ॅण्ड फ्लाईंग किस
बिनधास्त आरडाओरडा, दंगा 
अन मी..
अन मी जराशी बावरून 
हलकचं संकोचाचं हात टाकून उन्मुक्तीसं उत्सुक

खुल्या मैदानात...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...