शुक्रवार, ३ जून, २०१६

आभाळ


आहाहा! आभाळ किती छान भरून आलयं ना रे. ती हे विचारत होती तेव्हा तिच्या डोळ्यातही आभाळ भरून आलं होतं. त्याने फक्त होकारर्थी मान हलवली.
ती स्वत:शीच पुटपटावं असं हळूवार म्हणाली, ‘गेल्या चार पाच वर्षात पावसाळा अनुभवल्याचं आठवणीतच नाही. खरतरं पाऊस डोळ्यांना दिसलाच नाही.हे बोलतानाही तिच्या डोळ्यात पाऊस होता, अधूनमधून एकांत शोधत डोकावणारा.
तो तिच्याकडे पाहत राहिला. ती ही गप्प झाली. डोळ्यांतला पाऊसही गप्प होता. तिचा अन त्याचा अदमास घेत थबकून होता.
पुन्हा काहीतरी आठवावं तशी ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली, शून्यात पाहत!
मग एकाएकी म्हणाली, ‘कसली गंमत आहे ना, पावसाळा नाही कळला कधी पण रखरखत्या उन्हाच्या झळा दरवर्षी जाणवत राहिल्या.मग हळूच त्याच्याकडे पाठ करत तिने पापण्यांची उघडझाप केली तशा डोळ्यांतील पाऊसधारा गालांवर बरसून वाहू लागल्या.
बाहेर तर कोरड ठक्क होतं.
अन् तो मात्र पुरता भिजून गेलेला...!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...