सोमवार, २७ जून, २०१६

संवाद

आताशा लक्षात येऊ लागलयं,
तुझ्या माझ्यात काहीच उरलं नाहीयं. खरं खोट, तोंडदेखलं कसलचं काही नाही. पूर्वी यंत्रवत का होईना आपण वागायचो-बोलायचो. नात्यात ओलावा कमी झाल्याचं दोघांच्या लक्षात आलं होतं तरी सगळंचं काही शुष्क नव्हतं. रीतभात म्हणून तरी एकमेकांची चौकशी करायचो. बोलताना , आपलेपणाचे दोनाचे चार शब्द झाले नाही तरी न अडखळता जणू तेवढाचं संवाद असल्यासारखं गप्प व्हायचो पण आता तर नुसतचं अवघडलेपण आलयं. विचित्र वाटतयं सगळं. तुला वाटतं का असं विचित्र, अवघडलेलं की हे ही माझचं मत आहे. कधीतरी, केव्हातरी तुझंही मत नोंदवत जा. माझ्या मतांना चूकीचं ठरवतं जा, मला चूकीचं ठरवतं जा निदान स्वत:ला मुक्तपणे मांडत तरी जा....
शेवटचं वाक्य तिनं हॉटेलच्या टेबलावर हात बडवत म्हटलं. ती उद्विग्न, कासावीस झाली होती.
तो टेबलाच्या पलिकडे मान खाली घालून बसला होता. तिने मध्येच असं टेबल वाजवण्याने भानावर आल्यासारखं त्याने कानातील इअरफोन बाहेर काढला न म्हणाला, आवाज कशाला करतेस? महत्त्वाचा फोन सुरूयं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...