Monday, November 8, 2010

pausatil gmamat


2 comments:

 1. मलासुद्धा पाऊस खूप आवडतो़ आता तू लिहीलंस तेव्हढ्या छान शब्दात मला लिहीता येणार नाही, पण पाऊस अनुभवणं हे खरोखर खूप सुखद असतं. मी पाऊस खूप एन्जॉय करतो़ लोकं वेड्यात काढतील मला, पण मी 26 जुलैचा पाऊसही एन्जॉय केला होता. जे झालं ते वाईट होतं. पण त्यात त्या पावसाचा दोष नव्हता. मुसळधार पावसालाही मागे टाकेल असा पाऊस होता त्या दिवशी. कदाचित पुन्हा कधीच अनुभवायला मिळणार नाही. मी संधी साधली. इतर वेळेसही मी भिजण्याचीच संधी शोधत असतो. माझ्याकडे छत्री, रेनकोट वगैरे सगळं असतं. पण तरीही मी भिजतो. मुद्दाम. आदीमानवाला आकाशातून पडणारं पाणी जसा चमत्कार वाटत असेल ना तसंच काहीसं मला वाटतं. पाऊस पडताना आकाशाकडे तोंड करून पहायचं. चेहºयावर पावसाचे थेंब पडताना दचकायला होतं. मजाही येते़ ट्राय कर एकदा.
  तुला सांगतो, माझ्या कॉलेजचा (इस्माईल युसूफ महाविद्यालय, जोगेश्वरी) परिसर कुणालाही प्रेमात पाडेल एवढा छान आहे. मुख्य इमारतीच्याभोवती सगळं जंगल आहे. कितीतरी झाडं, डेरेदार वृक्ष, असं बरंच काही आहे. पण मला आठवतो तो कॉलेजमधला पावसाळा. सकाळच्या सातच्या लेक्चरसाठी कॉलेजच्या गेटमधून आत शिरलं की समोरचा रस्ता एवढा गोजिरवाणा वाटायचा मला! पावसामुळे अंधारून आलेलं असायचं. दुतर्फा असलेल्या झाडांमुळे तो समोरचा रस्ता हिरव्यागार गुहेत शिरल्यासारखा वाटायचा. त्या हिरव्यागार झाडांमधून पडणारं पावसाचं थंडगार पाणी, बाहेरच्या कोलाहलापेक्षा तिथं अनुभवाला येणारी शांतता, ओलसर रस्ता सगळच झकास! गम्मत म्हणजे पावसाळ्यात आमच्या कॉलेज इमारतीच्या मागच्या भागातून एक झरा वाहतो. तो वहात-वहात सगळ्या कॉलेजमधून धावत गेटपर्यंत येतो. मग आम्ही सगळे अनेकवेळा त्या झºयाच्या शेजारी गप्पा मारत बसायचो. सगळंच छान असायचं. एकवेळ मुलं लेक्चरला बंक मारतील, पण कॉलेज सोडून कुठं जायची नाहीत.
  पाऊस अनुभवताना त्याचा परिसर आणि वेळही तेवढा महत्त्वाचा वाटतो मला. शाळेतला पाऊस वेगळा वाटायचा. कॉलेजमधलाही वेगळा़ आज आॅफिसच्या खिडकीतून दिसणारा पाऊस तेवढाच वेगळा भासतो. तो खिडकीबाहेर मुक्तपणे कोसळत असतो आणि मी आत बंदीस्त. आज पहिल्यासारखं मला मुक्तपणे चिखलात खेळता येत नाही. बागडता येत नाही. मनात चुकचुकल्यासारखं वाटतं.
  तू लिहीलेलं वाचलं आणि हे लिहावंसं वाटलं. बोअर झाली असशील तर सॉरी.

  ReplyDelete
 2. ajibat nahi ulat khup chhan watal ki tula hi lihawas infact he sagal sangawas watal

  ReplyDelete

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...