गुरुवार, १४ जुलै, २०१६

व्यवहाऱ


ती असं खूपदा ठरवते, नाही म्हणजे नाहीच सांगायचं. कितीही काहीही झालं तरी नाहीच. त्याला तर मुळीच नाही.
पगारात झालेली वाढ, अचानक झालेला धनलाभ, किराणामालाचे परस्परच चुकवलेलं बिल, ऑफिसमध्ये लावलेली भिशी, घरकाम करणार्या मावशीचा दिलेला पगार, मित्राच्या उधारीची केेलेली परतफेड, थकलेल्या हफ्त्याचं ऍडजेस्टमेंट, अमूक तमूक हवसं वाटलं म्हणून केलेली खरेदी, बचत करून ठेवलेल्या पाकिटातले पैसे, मम्मीनं-पप्पांनी दिलं म्हणत स्वत:च बचतीतून घरासाठी केलेली खरेदी, कुठल्यातरी लेखाचं मिळालेलं मानधन, गुपचूप वटवलेल्या चेकचे पैसे असं त्या-त्या वेळचं ते-ते..बरचं काही...त्याला सांगायचंच नाही म्हणून मनाचा हिय्या केलेला असतो. पण न सांगितल्याची बोच, अपराधीपणा आणि ह्याहून महत्त्वाचं म्हणजे आनंद शेअर करण्याची झालेली अनावर उर्मी, तिला तासभरही हे लपवू देत नाही. मग पुढच्या वेळेसचं मात्र नाही सांगायचं असं ठरवून, ती त्या त्या वेळचा सगळा व्यवहाऱ त्याला चोखपणे सांगते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...