Friday, June 18, 2010

कोर आयुष्य आणि रिकाम मन

इज देअर समथिंग मिस्सिंग...शायद येस...आज सकाळी ''मेरा ओ सामान लौटा दो'' हे गान ऐकल आणि मन अस उगीच हलुवार झाल...प्रवाहात वाहत चाललेल्या आयुष्यात काहीतरी चुकत असल्याची जाणीव त्रास देऊन गेली....आपल्या हातात कोणाचाही हाता नसावा...सोबत नसावी...कोणीही फ़क्त हक्काचा असा माझा, कोणीच नसावा या भावनेने उदास वातु लागल ....इजाजत या फिल्म मधील हे गान...उत्कट प्रेमाचा आणि प्रेमाच्या वेगळ्या तरंगाचा, वेगळ्या मूडचा हा चित्रपट... प्रेमाची अजुन ही न भरलेल्या जागेची खोच आणि बोच ही देत होता....
मानसे निस्वार्थ पणे प्रेम करू शकतात ही शक्यता कितीही स्वपनवत वाटत असली तरी त्याच्या इतकी गोड़ अनुभूति काहीच नसते... अस खुप खुप मनापासून प्रेम करणारा प्रतेकला हवाच असतो कोणी नाकारत असेल तरी ते वरवरचे असणार यात काहीच शंका नाहीं...नुकतच वाचलेल आठवतय मेघना पेठे च्या ''आंधाल्याच्या गाई'' पुस्तकातील एका कथेत लग्न या प्रक्रियेतून स्वतला पूर्णपणे बाहेर काढणारी नायिका शेवटी नायकाच्या सहवासच्या आणि एक सहमानवाच्या भुमिकेशी येउन थाम्बते...हे आकर्षण आहे अणि तरीही हे आकर्षण प्रेमाचा एक बिंदु नाहीतर आणखी दुसरे काय आहे ....अनेकदा वाचनात निस्सीम प्रेमाची उदाहराने पहायला मिळाली अशा वेळी मग लग्न झाल्यावरही ज्यांची बाहेर प्रेम प्रकरणे आहेत मात्र तिथे कसलीच दगाबाजी नाही। त्यातही खरच प्रेम आहे आशा वेळी चुक कोणीच वाटत नाही अणि काहीतरी खटकत राहते, हे ही तितकेच खरे ...क्षणभराच्या का होइना पण खर्या प्रेमासाठी वेडावलेली जीव लावानरी माणसे...सगळी माणसेच....स्त्री वा पुरुष अशी न उरलेली माणसेच..... प्रेम या भावनेला समजनारी आनी जगनारी..कितीतरी कथा त्यातील नायक नायिका आज उगीच आठवत आहेत..जणू वाचानचा सगळा पटलच समोर उभा आहे....प्रेमासाठी आसुसलेले मन कशाची तरी खुप खोलवर ओढ़ धरत आहे ....काय ते नीटस उमगत नाहीये
प्रेम जे majhya ayushyat अजुन ही मिस आहे...त्या तरल भावानापासून अजुन ही मी दुरच आहे त्याची मला ओढ वाटत नाही अस तर काहीच नाही ना... माणुसपनाच्या नैसर्गिक भावानेपासून मी तरी कशी अपवाद राहु शकते !!!! मलाही तर मर्यादा आहेतच की....माणुस असण्याच्या....
ऑफिस सुटल्यावर माझी वाट पाहणार...त्याच्या स्वपनाच्या विश्वात नेणारा अजुन खास कोणीच नाही....कोर आयुष्य आणि अजूनही मन रिकाम.... पतझड़ है जैसे... ओफ्फिसला येताना, खासकरून निवांतपणे घरी जाताना झेड ब्रिज हा लागतोच ....कपल्स्चे आवडते ठिकान क्रोस करने हा सगळ्यात अवघड पॉइंट ....झेड ब्रिज वरुन जाताना तिथे दिसणार्या असंख्य कपल्स कड़े पाहून मन हरखून जात हेवा वाटतो....त्या सगळ्याचा अनोखा असनारा बंध... ही जोडपी, एक तरल भावनेवर नितांत सुन्दर प्रेम करतात...एक उत्कट अनुभव घेत असतात, हातात हात गुफुण गुज करतात..एकमेकांची सुख दुख समजुन घेतात, जगण्याच्या लड़ाईसाठी कोणीतरी सोबत असल्याची भावानाच किती आलाह्दादायक... प्रेरक ठरत असते.. त्या सगळ्या गोड़ क्षणाचा आनद ते घेताना रोज अगदी रोज दिसतात....जगण्यासाठीचा कैफ त्यांच्याकडे असतो....चेहरे बदलत ही असतील पण त्या वेंधल्या भावानाचे चेहरे तर कायम तेच उरतात ना....त्या सागल्या गोष्टीना पारखी होत मी....स्टील आई ऍम अल़ोन
लोकाना वाटत की आम्ही, आम्ही म्हणजे नोकरी करणार्य आम्ही करियर च्या मागे धावत आहोत ...पण ते अंतिम सत्य नाही न...स्वप्न आहेतच...वेगळ्या वाट चलायच्याच आहेत पण म्हणून नेहमीच्या भावना काय मितनार आहेत.... अपराध करतो का स्वप्न पाहतो तर ?? खरतर आम्हीसुद्धा दिलासा देतो स्वतला की येस वुई आर डूइंग डिफेरनट....फसवतोय..स्वतला...करियर अणि ड्रीम्स हावितच नाही कोण म्हानातय पण त्यासाठी सरल जगण्याचा बळी द्यावच लागणार आहे का....नॉर्मल का नाही जगाता येत आहे...प्रेमाच्या तरलतम भावानाचा अस्वाद का नाही घेऊ शकत....खुप मागत आहे का आयुष्याकडून किंवा अगदीच शक्य नसालेला...काम करुन थकलेल्या मनालाही कोणाच्या तरी हलुवार स्पर्शाची इच्छा आहे...फकत एकाकिपने नव्हेच....अपेक्षा आणि इच्छा दोनिकडून असतील त्या त्याच पधतिने समजुन ही घ्याची अहेताच.....कॉलेज चे दिवस तर असच अभ्यासात उडून गेले आता कामाच्या मागे स्वतला गुतावान्यत ही गुलाबी स्वप्नाची आस लावणारेही दिवस जातील, ही उगीच भीती वाटते....माणुसपानाच्या कोणत्याही भावनेला मी तरी अपवाद नाही तेव्हा ते सगल हव हवस नक्कीच आहे....वास्तवाच्या खरेपना हे पोकळ ठरत असेल ही कदाचित पण मानुस आहेच ना आणि त्यात तर काहीच चुक नहीं ना....!!!
कितीतरी असे क्षण आहेत जेव्हा मला तुज़ही आठवण येते...कमी जाणवते...अफकोर्से मला तू अजुन माहित नाहीस ...तुला अजुन पाहिले नाही का भेटले नाही पण तू आहेस ही जाणीव आहे....तुज्ह्या अस्तित्वाची ओढ़ आहे....कुठेतरी तुही माझी आठवण काढत अशिलच ही भावना जपते...अणि तुज्ही मनापासून वाट पहाते...कारन मला माहित आहे माझ्या आयुष्यात सगल कही खुप सुन्दर असणार आहे...तुझ्यासवे अणि तुझ्यासकट....ही पण एक गोड़ भावानाच आहे की तू प्रतेक्ष्यत नसतानाही तुझ्या असण्याची जाणीव रुदयाशी आहे.....
आजही पावसाच्या या रोमाँटिक वेलेत पुलावर सगली गर्दी ही खुप झाकास वाटत होती...आई नो की येकटेपनाची जाणीव तीव्र करत असली तरीही ती गर्दी उगाच आशावासक वाटत राहते..सरीवर सरी कोसलायला लागल्या म्हणून सहज पुलावर गाड़ी बाजूला घेतली..दोन मिनीटासाठी पुलावर उभी राहिले रात्रीच्या अंधार्य वेलेत गर्दी तशी नव्हतीच...आकाशातुन पड़ानर्या थेम्बाना एकटीनेच झेलत घरची वाट धरली....पुन्हा एअकादा एकटीने... तू कोणत्या तरी वलनावर भेटशील अणि मग सहवासाच्या उचतम पातालिवर नेउन प्रेमाची साद घालशील.... ही आशा आहेच पुन्हा

3 comments:

  1. some where, sumbody is maid ONLY for u

    ReplyDelete
  2. Wah Heena, 'Bahut Khub'. Agdi Ijajat Sinematlya Ganyapasun te Meghna Pethenchya pustkatil sandarbh ghet haluch swatache vichar yevdhya algad gumphle wah. tuzyach shabdat sangayche tar Tarltene tu shabda rachlet.Z Bridge sambdahit vichar zakasch malahi ekdam Bhutkalat gheun gelet. aaple likhan wachnaryala aaplese watne hech tya likhanache success aste aani te tu sadhlay. baki yatil shevtcha Tin wolitil tuzya icha Pratykshyat yeot yach sadichesah Namskar aani Adab.

    ReplyDelete
  3. solid likha hai,aisa kaisa bhala jamata tuze ,khud ke emotion ke sath dusaronko bhi itna attached karana ki unko lage " arre i am also thinking the same ,but i never expressed in word". i know someone is made for only u.

    ReplyDelete

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...