बुधवार, ११ नोव्हेंबर, २००९

जखमेतलं अंतर

मी पडते
मला जखम होते
डोळ्यात टचकन पाणी
घळाघळा वाहू लागते
सुसह्य
मी अनावधानं
मला पाडले जाते
मला जखम होते
डोळ्यात टचकन पाणी
आन वाहू हि न शकण्याची हतबलता
असह्य
हतबलता धोक्याची, खोटेपणाची
अन पाडावसं वाटण्याच्या वृत्तीची
रडताही न येऊ शकणारी हि विचित्र हतबलता
पडल्यानंतरच्या जखमेवर खपली
अन पाडल्यानंतरची जखम
काय व्हावे तीचं
यावी खपली कि राहावी ठणकतं कायमची
आणि राहिलीच तर कशासाठी
वाईट वृत्ती आजूबाजूला खद्खद्तेय
या जाणिवेसाठी कि
सूड उगवायला पेटण्यासाठी
डोळे अलगद मिटले
जखमेची खोल जाणीव पुन्हा तरळली
मन शांत झाल इतकाच कळल कि
पेटायचे तर प्रामाणिकपणासाठी
खोल खोल वसलेल्या चांगुलपणासाठी
डोळे अलवार उघडले
आकाश निरभ्र होते
पाऊस पडून सगळ निर्मळ झाल्याची
स्वच्छ ओळख ही
मी पडते...पाडले जाते
जखमेतलं अंतर घटलेयं
अन छातीत दुखायचंही..

२ टिप्पण्या:

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...