रविवार, ६ सप्टेंबर, २००९

कविता

शिशिरातील मंद झुलुक
जुनाच संदेश घेऊन आली
मी उन्मुक्तच असल्याची
नवी ओळख देऊन गेली
आज परत हे नीलसर आकाश
माझ्या मुठीत सामावलाय
आता ना काही हरवण्याची भीती
न काही हरन्याची
क्षितिज्यचाही पल्याड आले मी
मलाच शोधता शोधता
आता ना मागे फिराकयाचे
न वाट वाकडी करायची
आता फ़क्त आसमंताला
मुठीत घ्यायचे
आड़ वलानाची चिन्चोली वाट आहे
हरकत नाही
सृजनाचे पंख मी केंव्हांच
आभलभर पसरवलेत

1 टिप्पणी:

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...