शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

तुझं माझं नातं



तुझं माझं नातं
दूरस्थ
दोन शहरांच्या टोकावर
आशाभूत
व्याकुळलेलं

तू दिसत नाहीस मला
दिवस रात्र,
आठवडे,
महिने
तुझा आवाज पोचतो
दिवस रात्र,
आठवडे,
महिने
तुझा स्पर्श नसतो
दिवस रात्र
आठवडे
महिने
तुझी भावना पोचते
दिवस रात्र
आठवडे
महिने

थोडा है, थोडा बाकी
हट
बहुत बाकी
यातल्या एवढ्या तेवढ्या कशानेच
खरंतर
मला बरं वाटत नाही
ते वाटूनही घ्यायचं नाही,
नसतंच ना रे घ्यायचं...
दूराव्याने कुणाला बरं वाटलंय,आजवर?

मी तर
विरहानं, वासनेनं, वेदनेनं
गमगीन आहे
थोडी तुझी दिवानी
थोडी त्रासलेली आहे
तू हवाय म्हणताना
मला लाज नाही वाटत
तू हवाय म्हणताना
मी मुरकत ही आहे
तुझी रुखरुख जाणवते
तुझी हुरहूर वाटते…
सगळं एकावेळी दोन किंवा असंख्य
भावनांचा गुंता आहे

परंपरांची चौकट भेदत
प्रेम पोचलं आपल्यापाशी
अंतर का शाबूत आहे तरीही
वेदनेशी गाठ घालत?
जखमांचे व्रण सारे
स्पष्ट दिसतात
वियोगाची ठसठस सांग
कशी दाखवतात..

यार कोण कुठले
संस्कार,
जबाबदाऱ्या,
कर्तव्य, कोडीसाठी
कन्हत आहे
आपलं आयुष्य...
कणाकणाने
मरत आहे थोडं थोडं..

त्या सगळ्या
मर्यादांना मारूयात लाथ?
धरुयात सावली?
एकमेकांवर एकमेकांची

तुझं माझं नातं
मग
केवळ
बहरत
बढत
बरकरार होईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...