मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

सिग्नल

‘‘ऐक ना.. आज मी माझ्याच गाडीवर फिल्डवर जाईन म्हणते.’’
‘‘का पण? बीट वेगळे असले तरी आपली वाट एकच आहे.’’
‘‘तू पाहिलं नाहीस का? आपण उठलो, की रवी, महेश, अजय, सुधा, तेजश्री, काळे सर, गोरे सर, सीमा मॅम, ग्रामीणचे मामा,  मेनडेस्कचे जोशी सर, केबीनमधले पटवर्धन, ऑपरेटर सम्या, कल्पेश, लोखंडे सगळेच्या सगळे माना उंचावून बघतात. तुला त्यांची नजर कळत नाही का?’’ ती एका दमात म्हणाली.
‘‘श्‍वास घे. तसंही मला क्त तुझी नजर कळते.’’
‘‘. जाऊ दे. तरीही मी माझ्याच गाडीवर जाणार.’’
‘‘बरं! मी तुझ्या मागे बसतो. ’’
‘‘तू म्हणजे अवघड आहेस.’’
‘‘अवघड तर खूप काही आहे. तुला सांगतो,  फिरस्त्या रिपोर्टरच्या खिशाला पेट्रोलचे वाढते भाव परडवत नाहीत गं. गाडीवर तिच्या मागे बसता बसता तो बोलला.‘‘हं, कळला, तुझा कटाक्ष कळला. पण मी पेट्रोल दरवाढची ब्रेकींग पाहूनच बोलतोय. आता सरकारने एवढी कृपा केली तर तू का अच्छे दिनहिरावतेस?’’
ती बोलण्याच्या अवकाशात, की ट्रक तिच्या गाडीला ओव्हरटेक करत गेला. त्याने झटकन तिच्या खांद्यावर हात ठेवला.  त्याच्या तेवढ्याश्या काळजीने ती मोहरली.  मग लटक्या स्वरात म्हणाली, ‘‘हम्म. बरोबरंय तुझं. तसंही लोकांपेक्षा पर्यावरणाची अधिक काळजी करावी. ’’ 
आणि तिने तत्परतेने सिग्नलवर गाडी बंद केली. येलो सिग्नल रेड होऊन त्याला ग्रीन सिग्नल देत होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...