Sunday, September 25, 2011

एक पाकीट उलगडले अन...

भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट व्हावी यासाठी जनलोकपाल बिल खूपच आवश्यक आहे अस वाटून आपला अवघा परिसर या एका भावनेने भारावल्याचा अनुभव अजून बराच ताजा आहे. हे बिल नेमके काय आहे हे फार जाणून न घेताही केवळ भ्रष्टाचाराला विरोध होतोय म्हणून हि यात सहभागी होणार्यांची संख्या  खूप जास्त होती. बिलाविषयी  फारसे माहीत नसताना हि याचे सगळीकडे उदो उदो करण्यात आले. हे घडून हि फार दिवस उलटलेले नाहीयेत. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांच्या रामालीलावारच्या आंदोलनाबरोबरच देशभर नुकतेच उपोषण झाले..मी अण्णा, मै अण्णा हु..आई अम अण्णा म्हणत भ्रष्टाचारच्या विरुद्ध आबाल वृद्धांनी आरोळ्या ठोकून झाल्या. कुठल्या तरी एका बिलाने भ्रष्टाचार संपेल या स्वप्नाने सगळेच चमत्कारिकरित्या या आंदोलनाचा भाग होऊ पाहत होते.. वातावरणात आंदोलन, उपोषण अन मी अन्नाचा नारा असा काय मिसळला होता कि ''मागण्याच्या'' घाणेरड्या प्रवृतीला आता चाप बसेल अस वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली होती  अर्थात ते मृगजळच...!!! हे सगळ वर वर पाहता तसं आलबेल..पण प्रश्न असा उभा राहतो तुमच्या माझ्यापर्यंत झिरपलेल्या अन रुजलेल्या या लाचखोर वृत्तीचे काय??? घेण्याच्या अन देण्याच्या तडफदार वागणुकीचे काय??? मूळ उखडून पडत नाही तोवर छाटल तरी इतरत्र फांद्या विस्तारत राहणारच की!!!

परवा एका नामांकित बँकेच्या नव्या शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. हिंजवडीला नवी शाखा अन त्यांच्या लक्ष्मी रोडच्या शाखेत एका वैयक्तिक कर्ज देण्यासाठी च्या एका बुटिकचेही  उद्घाटन. बँकेच्या सिअमडीच्या हस्ते हे सोपस्कार पार पडले. बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख वाचून झाला. बँक किती जुनी अन विश्वासू आहे याचा इतिहासही कोणीतरी आठवला. सगळ झाल्यानंतर गणपतीचे दिवस असल्याने मोदक अन चहा चा नाश्ता ठेवण्यात आला होता. पत्रकारांना विशेष आग्रह केला. मला घाई होती म्हणून कार्यक्रम झाल्यावर निघायला लागले तर तेथील पीआरओ ने अन व्यवस्थापकाने थांबवले..कार्यक्रमाची एक प्रेस नोट दिली. कार्यक्रम पत्रिकेचे एक पाकीट परत दिले. ते जरा चाळून झाल्यवर निघते म्हणाल्यावर त्यांनी परत एक लाम्कुळे  पाकीट दिले. त्यात कसले तरी पत्रक असल्याचे दिसले, म्हणून फार काही मन लावून चाळले नाही अन बाहेर पडले. तिथून पुढे कोर्ट केले. म्हणजे तिथले रिपोर्टिंग केले. ऑफिसमध्ये आले अन म्हंटल बँकेची बातमी आधी करूयात. सगळी पोडकी समोर ठेवली. वही काढली. बातमी लिहायला घेतली अन आठवले कि आपण शेवटचे पाकीटच उघडले नव्हते. म्हणून मग समोरच्या राड्यातुन ते पाकीट घेतले अन उघडले तर त्यात ५०० ची एक कोरी करकरीत नोट होती. नोट पहिली अन एकदम डोकेच सटकले..डोक जाम दुखायलाच लागले, पोटात गोळा आला आणि आपल्याकडून काही तरी पाप झाल्यासारखेच वाटायला लागले..जाम वैताग अन चिडचिड झाली. ते पाकीट म्हणजे लाच होती, बातमी छापण्यासाठीची आणि मुळात त्रास हा होत होता कि त्याने दिले यापेक्षा मी ते घेतले कसे?? न पाहता पाकीट घेणे हा सुधा अपराधच तर होता...दैनिकांना विकत घेता येते अन त्यासाठी पत्रकारांना आमिष द्या या विचारांची किळस वाटली...आपण (व्यक्तीपेक्षा संस्था ) विकले जाऊ शकतो अस समोरच्याला वाटणे, केवढे अपनास्पद आहे...

प्रचंड त्रास झाला..अर्थात यापुढे या बँकेची बातमी तरी कशी लिहिली जाणार होती...इतक्यात अविनाश थोरात हे प्रमुख सर आले. घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. तेही चिडले.. काहीही चालुन जाइन या विश्वासचा त्रास सर्वनाच झाला... संबंधित माणसाला फोन करून आपले पाकीट घेवून जाण्याविषयी शांत पण कडक भाषेत त्यांनी सुनावले..घडल्या प्रकाराने मी मात्र अस्वस्थ झाले. पत्रकारितेतील माणसे हि नक्कीच ''माणसे'' असतात..लोभ आणि माया यानाही भुलवतातच. पन सरसकट  सर्वना एकच नजरेतून  पाहने चिडचिड करायला भाग पडणारे होते. या घटनेने डोके जाम दुख्याला लागले..मान दुखायला लागली..बातमी करण्यातले मनच  उडाले होते..पण शेवटी काम तर करवेच लागले..पण अशा प्रसंगाने आपल्या सध्या विचारसरणीवर अन  मनावर होणारे आघात दीर्घकालीन त्रास देणारे असतात अन तितकेच असहनीय..!! 

No comments:

Post a Comment