मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

फेसबुक पुराण

माणसाला काम करता करता मधे मधे थोडा विराम लागतोच. पण ऑफिस सोडून बाहेर पडण्याची हि सोय नसते (उगीच आपलं लोग, पाट्या टाकतात म्हणायला मोकळे...अर्थात ऑफिसमधे बसून हि अनेकजण आता पाट्या नाही पण आजकाल जाळे टाकतातच ) ऑफिसमधे बसून ही थेट बोलता येत नाही. त्यातच जर आपल्याला ऑफिसच्याच गोष्टी चर्चा करायच्या असतील तर मग काही सांगायलाच नको. अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपला gmail मदतीला येतोच. साधारण परवाची गोष्ट आहे...आज काल लोक इतर कुठे भेटण्याची शक्यता नसली तरी ते फेसबुकवर पडीक असतातच..इथे सगळी हरवलेली माणसे भेटणारच..पण अति झाले अन मातीत गेले या म्हणी प्रमाणे सध्या फेसबुकच पण अति झाल्यासारखे वाटते. या सगळ्याला वैतागून पराग सरांनी ''मेंदूला काही क्षण तरी विश्रांती हवी'' असे gmail वर स्टेट्स टाकले होते... हे खूप खर आहे अस म्हणत मी त्यांना उत्तर दिले आणि इथून पुढे gmail वर फेसबुक पुराण रंगला तो असा..






पराग सर : फेसबुक now fade up बुक
मी : रिअली
पराग सर : हो ना नुसते आपले त्यावरच लोक पडीक असतात.
मी : म्हणून तर सध्या मी अक्टीव नसते..मध्ये तर मी कंटाळलेच होते.
पराग सर : कोणाच्या ध्ये??
मी: कोणाच्या मध्ये नव्हे म्हणजे मध्यंतरी...!! रादर आपल्या फ्रेंडसच्या आयुष्यातील अपडेट फेसबुकवरुन कळावे या सारखे दुदैव नाही. वैताग अन चिडचिड व्हायची...
पराग सर : हम्म खर आहे . पण चिडचिड का व्हायची...
मी : आपल्या मित्र मैत्रिणीच्या आयुष्यातील गोष्टी आपल्याला फेसबुकवरून कळावे...किती वाईट..त्यांचे अपडेट्स त्यांनी देण्यापेक्षा फेसबुक देणार...इज इट गुड??
पराग सर : हा हे खरे आहे..पण सगळ्यांच्या संपर्कात एकाच वेळी राहता पण येत नाही ना!
मी : हे हि खरे आहे पण फ्रेंड्स पण हेच कंसीडर करायला लागतात कि एफ बीवर टाकले कि काम झाले..सवांद संपतो यामुळे अन एफ बी वर टाकले होते कि वाचले नाही का म्हणत परत आपल्यालाच मुर्खात काढण्यात येते..बर काही वेळेस तर काहीच्या काही स्टेटस असतात..
पराग सर: हे हि खरे आहे..म्हणून तर माज्या मेंदूला आराम हवा आहे..मला जाणवले कि माझा मेंदू झोपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खूप सहन करतो..
मी : राइट
पराग सर : काय करावे बर solution सापडेना..
मी : आपणच थोडे लांब राहावं..
पराग सर : कुणापासून
मी : social साईट्स अन अति सोशल माणसापासून..
पराग सर : मला पण तेच वाटते. सोसेल इतकेच सोशल राहावे....वा वा पराग !!
मी : वा वा पराग..सर. :)
पराग सर : फेसबुक अपडेट टाकावे म्हणतो हेच.
मी : व्हेरी bad
हेच हेच थोडे कमी हवे.
पराग सर : ही ही. खरच रे..
मी : आयुष्यात एक श्वास घेतला नाही कि लगेच त्याचे अपडेट्स देणे गरजेचे आहे का?
पराग सर : छान आहे हे पण नावे पोस्ट होवू शकते नाही का..
मी : .....
पराग सर : हा हा हा
मी : जरा काही लिहीले नाही के त्यावर प्रतिक्रिया हव्या असतात..
पराग सर : खर आहे मी ब्लोग पण स्वतासाठी लिहितो अन तो सोशल कधी होतो कळत नाही. स्वताशी सवांद कमी होतो अन आपण रीअकशन मधून स्वताला तपासू लागतो..
मी : एकदम सही ही बोस..
पराग सर: यावर जरा लिहावच म्हणतोय..


आणि


हो


तो सोसेल वाला फेसबुक अपडेट केलाय..कॉमेंट दे डीअर!!


..........................


अस म्हणत पराग सर  sign out पण झालेले......मी फेसबुक सुरु केले...सरांचे स्टेटस पहिले अन नकळतपणे लिहिलेच...कि इतक्या वेळच्या गप्पांवर-- मुख्य म्हणजे इतक्या गहन चर्चेवर पाणी पाणी..

२ टिप्पण्या:

  1. साधी डायरी लिहीण्‍यात जो आनंद आहे ना तो फेसबुकच्‍या अपडेटमध्‍ये नाही. प्रत्‍येक गोष्‍टीवर कॉमेन्‍ट करणं आवश्‍यक आहे ही गोष्‍ट रिअॅलिटी शो आणि फेसबुकने सगळ्यांच्‍या गळी उतरवल्‍यासारखी वाटते. या फेसबुकविरोधी पुराणाला फेसबुकवर 'लाईक' करायचं नाही असं ठरवलं आणि 'कॉमेन्‍ट' करायला इथं आलो.

    उत्तर द्याहटवा
  2. ते हि खरच आहे म्हणा..आपण react झालेच पाहिजे असे सगळ्यांना वाटू लागलाय...इट्स रिअली मेक यु अनइजी

    उत्तर द्याहटवा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...