रविवार, ८ मे, २०११

माझी माय

माझी माय
दिवस रात्र माझ्यासाठी दुवा करते,
इतकी इतकी दुवा करते कि
मला अगदी रडूच कोसळते
अल्लाहला म्हणते
माझ्या लेकीच भल होऊ दे
भल म्हणजे आणखी किती सुखी
हे तिलाच ठाऊक
पाहिलंय मी कित्येकवेळा दुवा करताना
तिच्या डोळ्यातील बेमालूम आसू
थेट काळीजच ओलं होत माझं
असं वाटत दूर दूर निघून जावं
ढसा ढसा रडावं..
एकदम मोकळ हलक झाल्यावर
परतावं अन तिच्या कुशीत शिरावं
पाण्याने गच्च माझ्या मिटलेल्या डोळ्यावर
ती तिचे ओंठ टेकवेन आणि मगच मन शांत होईल

कधी अचानकच ती गोड हसते
खूप खूप प्रेमाने बघते
मायेने चेहऱ्यावरून हात फिरवते
अशा वेळेस वाटत सरळ तिला बिलगावं
अन म्हणावं मां मैं खुश हुं
ठाऊक नाही तिला कस माझ्या मनीच कळत
जाणती हुं बेटे तू खुश हैं
ये ख़ुशी और अल्लाह का प्यार
तुझपे युंही बना राहे
इसलिये दुवा करती हुं.......

मन जड जड होत
माझ्यासाठी तू रोज रोज दुवा करावी
मी इतकी चांगली नाही ग...खरच नाही

पण माझी माय
आतासुद्धा माझ्यासाठी दुवा करत असेल
अन नुसत ते आठवून हि
मन भरून येतेय...मन भरून...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...