रविवार, २४ एप्रिल, २०११

वळवाचा पाऊस


पिवळसर संध्याकाली उन उतरताना,
सूर्य जरा ढगांच्या आडोश्याला गेलेला असताना
गच्चीच्या दारातून दिसणारा वळवाचा पाऊस
वाऱ्यासंगे येणारा मोगऱ्याचा सुगंध
पलीकडे गुलमोहराची लाल-पिवळसर-गुलाबी डुलणारी फुले
अल्लाहशी सवांद साधत जपमाळ घेऊन बसलेली मा
आकाशाशी कि स्वताशीच गुज करत बसलेले पपा
या हुरहुरणाऱ्या क्षणी मोठी होऊ लागलेल्या
लहान बहिणीच्या येरझाऱ्या
शांत निवांत वाहणारा वारा..रिमझिम पडणारा पाऊस
अन माझ्या डोळ्यापुढे उभी राहत जाणारी मां-पपाची शांत मुद्रा...



................

पिवळसर संध्याकाळी उन जरा उतरताना
सूर्य हि जरा ढगांच्या आडोश्याला गेलेला असताना
मन सैरभैर होते अन मलाच मी जडशीळ होते....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...