मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

आमची लाडकी शिरीन

घरातील सर्वात लहान मुल म्हंटले कि नकळतपणे ती सर्वांची लाडोबा असतात...माझ्या घरात हि अशीच लाडोबा आहे शिरीन...माझी सर्वात लहान बहिण.. शेंडेफळ..कधी मधी मी तिला 'शेरणी' अशी पण हाक मारते। तर सांगण्याचा मुद्दा हा कि मी तिच्या वर्णनाची सुरवातच मुळी 'लाडोबा' म्हणून केली आहे, ती हेच सांगण्यासाठी कि तिला कायमच घरकामातून सवलत मिळाली आहे. गंमत म्हणजे तिची हरवलेली वस्तू आपल्याला शोधून द्यावी लागते. ती वही किंवा पुस्तक कुठे तरी ठेवणार, थोडक्यात नंतर ते काही केल्या सापडणार हि नाही. मग ती "खूप?" शोध घेणार तिला ती अर्थातच सापडणार नाही आणि मग तीचा मोर्चा आमच्यकडे वळणार...ती आम्हीच हरवलीये अशा तावात आमच्यावर वैताग करणार आणि आम्ही ती शोधूनच दिली पाहिजे असा अट्टाहास असणार.... मग ती वही कुठे सापडायची माहितीये, तिथेच जिथे या maadaam ने शोधली ? असायची....तिचा शोध ५ मिनिटात संपायचा आणि तिथून आपण सुरु करायचा....अशी हि आमची शेरनी...!!!

पण माझी हि लहानगी बहिण आता काही लहान उरली नाही,हे लक्षात येऊ लागलाय. मध्यंतरी मी युपीला गेले होते. मी एकटी कशी जाणार म्हणून मां सोबत आली होती. या काळात पपा अन शिरू हे दोघेच घरात राहणार होते...सगळी घरची जबाबदारी हिच्या खांद्यावर. आमच्या या madam अभ्यास करत असल्या कि पाणी सुधा हाताने घेऊन पीत नाहीत...इतकाच काय तिने सकाळचा चहा घेतला असेल तर.....!!!! तिला तो मांनेच बनवून द्यावा लागतो...(सकाळचा चहा मांच्या हाताने घेणे हा ती तिचा अधिकार समजते) अशी हि शिरीन घरात मोठ्यांसारखी वावरू लागली. मांच नाही म्हणजे तिला हि जबाबदारी घेणे भागच होते... किचेनमध्ये फिरकणार नाही पण तिला स्वताला चवीच खायची आवड आहे. आणि म्हणूनच १५ दिवसांच्या काळात पपांना तिने मस्त करून खाऊ घातले...मेथीची भाजी, मसाले भात, चपाती-भाकरी, पोहे, भरलेले वांग, विविध भाज्या इतकाच काय पण मटणसुधा...बर करायला काय जात ना..कोणीही करेल, महत्वाचे असते ते चवीने करणे...खाताना मस्त चव जिभेवर रेण्गलायला हवी ना !! पण शिरीन ज्याला हात लावेल ते बिन चवीचे होणार कसे....माझे पपा हे मां घरी नसले कि खूप कमी जेवतात (यावरून आम्ही त्यांना खूप त्रास देतो आणि प्रत्येकवेळी मा घरबाहेर जाणार असली कि आम्ही तिला पपांना 'धमकी' द्यायाला लावतो..एक तर त्याना मां नसली कि जेवण जात नाही आणि दुसर्या कुणाचे फारसे आवडत नाही.)

पण यंदा घडलं जरा निराळच....स्वतः पपांनी तिच्या जेवणाचे कौतुक केले...मां ला म्हणाले तू काय अन हिना काय दोघींपेक्षा उत्तम स्वयंपाक करते...आम्हला हे ऐकून खूप आनंद झाला एक तर पाप फार कमी वेळा कोणाचे कौतुक करतात अन दुसरी गोष्ट म्हणजे शिरीन mature झाल्याचा आनंद हि होता. (म्हणजे ती मुळातच mature आहे पण काय न घरकामाचा कंटाळाच भारी...) त्यामुळे १५ दिवस आम्ही निर्धास्त पणे जगू शकलो....घरच्या कामात तिला मिळणारी तिची सवलत आजही कायम च आहे. पण आपलीच एक व्यक्ती नव्याने कळायचा आनंद आहेच की...

ता. क. : आज काल माझ्या लहान बहिणी मोठ्या झाल्यचा मला वारवार लक्षात यायला लागले आहे...एक तर त्यांना पटत नसलेल्या अनेक गोष्टी त्या मोकळेपणाने बोलायला लागलेत, दुसर म्हणजे कोणत्याही अडचणी, कसलेही वाद आणि कितीही खाजगी बाब असली तरी ते नेमकेपनन माझ्याशी share करते... आज काल त्यांचे एसमएस हि गमतीदार असतात... शिरीन अन गुड्डी दोघिहि असाच मेसेज करतात कि वाटत अरे या तर मोठ्या झाल्यात..काहीवेला त्यांचे प्रश्न हि चमत्कारिक असतात कि त्या प्रश्नांची उत्तरे द्याची कशी हा एक प्रश्न अन त्यांना हे अस भलताच मला विचारण्याचा मोकळेपणा येतो कुठून हा दुसरा प्रश्न.....!!! लहान बहिणी बहुदा अश्याच असतील एकदम sनिरागस !!!!!

1 टिप्पणी:

  1. this not fare .tune blog pe kyu likhi....i want to be in reserved...!ab ye pathane everyone how i am....
    then also thanx mere me kuch hai(aag)jiske bare me likha ja sakta()...DHANYA HO GAYEE MAI TO AAPKE LEKHANISAPRSH SE...

    उत्तर द्याहटवा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...