हाय ब्लॉग, खुप दिवस झाले काही लिहिलेच नाही...महिनाभर नाशिकमधे होते...रिफ्रेशमेंट कोर्स झाला....मजा केली आणि हो शिकालोही बराचकाही....अर्थात तुला माझ्यावर नक्कीच विश्वास असणार की मी शिकण्याचा हि नक्कीच प्रयत्न केला असेल ....मला आठवत आहे की बाविस्कर सरांचा फ़ोन आला होता की हिना तुम्हाला ट्रेनिंगला जायच आहे.."आर यु रेडी " मी जागेवर स्तब्ध झाले... मला खरच जरा चकित व्हायला झाल...पण ती खरच माला मिळालेली संधी होती ऑफिसमध्ये मी एकतर जुनिअर आणि अनुभवाने हि लहान तेव्हा हि संधी मला धक्का देऊन गेली होती..नाशिकला ३ डिसेंबरला पोहचले. १९ जन वेगवेगळ्या आवृतीतून आलेले...दोन बंगले होते...आमच्या बंगायात पद्मजा विनोद, विकास, सुमंत , उमेश, संजय सर हे कायम होते काही जन येत जात राहिले...या सगळ्यांसोबत छान गट्टी जमली...तेथील अनुभव ही खरच खुप छान होता...नवीन मित्र मैत्रिण मिळाले...इट्स रिअली नाइस एक्सपिरीन्स....३५ दिवस घराबाहेर एकट राहण्याचा अनुभवच खुप वेगला होता. नवीन काही तरी सांगुन जाणारा...आपण आपल्यालाच जेव्हा उलगडायला लागतो तेव्हा खर तर आपण एकदम शांत होत जातो....तस काहीतरी मलाही झाल होत....विनचे ''चल बे'' ने दिवसाची सुरुवात करायची सवय लागली होती. विकास कधी लवकर आवरायचा नाही आणि आम्हला इतक्या लवकर आवरून काय काय करणार म्हणून उलट प्रश्न करायचा...उमेश कधीच वेळेवर काही करायचा नाही...सुमंत सर हे एकदम भन्नाट होते..त्यानापाहून असे वाटले नाही के ते उत्तम कॉमेडी करू शकतात..एकूण आमच्या बंगल्यात आमची सगळ्यांची छान गट्टी होती.. मग जयेश आणि वासू हि होतेच सगळ्या उपक्रमांना.....पद्मजा ला जेव्हा पण हक मारायचे वासू मला म्हणायचा तू तिला जा म्हणते मग ती येणार कशी...??? वासूचे प्रश्न आणि जायेश्चे शांत असून मिस्कील वागणे एक करामत होती आम्हला. शेवटच्या दिवसांत सगळ्यासही छान बंध निर्माण झाला होता आणि असे वाटले की शेवटचे दिवसच खुप भरकन निघून गेले....सगळ्यात छान वाटल ते व्यक्ति मापन आणि अतुल पेठेचे लेक्चर....नीलू दामले यांचा रिपोर्ताज अणि अभय तिलक सरांचे सध्या सोप्या शबदतिलlअर्थविश्व....बदलते प्रवाह ही कलले आणि आपण प्रवाहात कुठे आहोत तेही माहित झाले...एकून मजा आली सगल अनुभवताना अणि निघताना थोडासा त्रास ही झालाच...इथल्या गमंती परत सगेल विशेष करून एक मैत्री विषई पण सांगणार...तुर्तास ब्लॉग बाय..
शुक्रवार, १४ जानेवारी, २०११
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
Nowdays marraige fever is going on. somebody and other is going to marry and these sweet ppl coardilly invited me..(feeling great, to enjoy ...
सुफियान अन त्याचे मित्र
गोष्ट तशी गंमतीची. माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...
खूप छान.
उत्तर द्याहटवामराठीत ब्लॉग वाचताना छान वाटते.
या ट्रेनिंग मध्ये आमचा उमेश अनपट पण होता. आमच्या (आदरार्थी अनेकवचनी स्व-संबोधन) नशिबी हि संधी येईल कि नाही कोणास ठाऊक.?