शुक्रवार, १९ मे, २०२३

प्रियकरा

 

प्रियकरा

तुझ्या मनाच्या अस्थिर भोवऱ्याने

माझ्या पोटात गोळा आलाय

नाही, खोल खड्डासुद्धा पडलाय..

या अस्थिरतेतून

निघणारे तरंग, चक्र, आवर्तनं

माझा श्वास खेचतायेत

भोवऱ्याच्या निमुळत्या

केंद्राकडे...

मी जडशीळ, माझं शरीर जडशीळ

नसनसांत ठणक आहे

बेचैन प्रवाहांची

तुझी अस्वस्थता

माझ्या गर्भाशयापर्यंत

येऊन पोचलीये,

आता यातून केवळ सृजन व्हावं

तरच ठीक

अन्यथा अपुऱ्या वाढीचा

ठरलेला  गर्भपात...

मला सोसणार नाहीये, प्रियकरा!

ए, प्रियकरा...

तुझ्या अस्थिर, अस्वस्थ, बेचैन

कंपनांवर एकच फुंकर आहे

मला घट्ट मिठीत घे

गरगरून खाली जमिनीवर

कोसळण्याआधी...

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा