शनिवार, ४ मार्च, २०१७

वाट पाहत आहे

माझ्या श्‍वासांत गुंतताना
मज रोम-रोम स्पर्शताना
तू पाहशील माझ्या डोळ्यांत
मी वाट पाहत आहे
कैक दिवसांपासून...

माझे स्तनाग्र चोखताना
पाठीवरून हलका हात फिरवताना
सर्रकन अंगावरून धावणारा
रोमांचाचा काटा उमटेल
मी वाट पाहत आहे
कैक दिवसांपासून...

माझ्या मानेवरुन सरकत
ओठांकडे येताना
तू श्‍वासांची धाप उरकण्याऐवजी
रत होशील प्रणयात 
मी वाट पाहत आहे
कैक दिवसापासून...


बहुदा,
शरीरांच्या लाटांवर पाय ठेवत
तू जेव्हापासून चाखलयंस देहाचं मीठ
तू डोळ्यांच्या समुद्रात उतरेनासा झालायंस..
हो रे, मिलनाच्या अतिउच्च बिंदूपाशी
देहच बनून जातो प्रेम प्रणयाचं माध्यम
तरीही इटुकलीशी विनंतीय
करूयात का एममेकांच्या डोळ्यांतही प्रवास 
जून्या हाका, जूने स्पर्श,
जूने रोमांच, जून सारं पुन्हा उमलू दे
बघ, तुला खात्रीनं सांगते,
भर दुपारी, पडक्या भिंतीमागे
जिथं मी शहारले होते अन तू मोहरला होतास
आपण पुन्हा तिथंच भेटू.
हो खात्रीनं सांगतेय आपण पुन्हा तिथंच भेटू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा