Tuesday, June 21, 2011

मासी....मा जैसी..

में मासी बन गयी हु...मां जैसी, मासी...फिलिंग ग्रेट.नेमक्या शब्दात नाही पकडता येणार, पण हे खूपच सुंदर. काहीतरी मस्त वाटावे अशी फिलिंग आहे. आता हे चिमुकले जीव मला नेमक्या काय नावानं हाक मारणार नाही ठाऊक म्हणजे मावशी, मासी, खाला कि मग खालामासी, काहीच नाही, पण आज सकाळपासून या निराळ्या भावनेने मला खुप आनंददायी केले आहे. मां जैसी होण्यातील मज आहे. सकाळपासून एक गाणे गुणगुणत आहे, ''मेरे घर आई एक नन्ही परी..'' मावशी बनण्यातील हि गम्मतच निराळी आहे. एखाद्या चिमुकल्या जीवाच्या आईच्या लेवेलला जाणे, मस्तच!! काल एका जीवाच्या मैत्रिणीला मुलगी झाली....आणि हा मी जगात असलेला आनंद तिने अन तिच्या लेकीने दिलाय..

ताई, माझी मैत्रीण, सख्खी मैत्रीण...काल ताईला दवाखान्यात नेले होते, मी घरी आधीच सांगून ठेवले होते जेव्हा ताईला दवाखान्यात नेण्यात येईल मला लगेच कळवलं जाईल. दुपारच्या वेळी मी अगदी कशाची तरी माहिती घेण्यात इतकी गढून गेलेली असताना माझा फोन वाजला. आणि गम्मत म्हणजे हा फोन मला ताईनेच केला आणि तिनेच मला हे सांगितले कि हिना, वेळ आली बहुतेक...त्या क्षणापासून मी एका अलाह्ददायक क्षणाची आतुरतेने वाट पाहायला लागले. आता आपण मावशी होणार या एका भावनेने वेड लावले. रात्रीच्या वेळेपर्यंत तरी कसलीच खुश खबर आलेली नव्हती. म्हणून मग ऑफिस सुटल्यावर थेट तिच्याकडे गेले. हिरवा गाऊन घालून ती बसलेली होती. मला पाहून आनंदायचे सोडले, अन इतक्या रात्री कशाला आलीस आता भेटलीस न मला, चल निघ पटकन उशीर होईल घरी जायला असा दम भरला..(त्या चिमुरडीने हे ऐकले असेल तर ठाऊक नाही काय विचार केला असेल माझ्याविषयी, नाहीतर आईसारखी मला हि दमात घ्यायची..) माझ्याविषयीची तिची काळजी या अवस्थेत हि संपलेली नव्हती.(अशा वेळेस तुम्ही खूप ग्रेट फील करता,नाही का ) मी काही उत्तर देणार तर तिने आई ग दुखतंय म्हणून एकदम कन्हायला सुरवात केली आणि हे असे काही मला अगदीच सहन होत नाही...दवाखाना, पेशंट या सगळ्याने मीच गळून जाते. यानंतर तीच मला म्हणाली, झाली कि कळवते बाळ काय म्हणतय निघ आता, त्यातच तिचा त्या ढगल्या गाऊन मधला काह्णणारा, वेदनादायी चेहरा मलाही पहावतच नव्हता, मी पण निघाले.. सकाळी ६ वाजता रामला फोन केला तर त्याने मला हि गुड न्यूज दिली, मुलगी झाली आहे. ताई तुला सांगते त्या क्षणी मला तुझ्यापाशी असण्याची इच्छा झाली होती. खूप आनंद झाला. मला हि बातमी तीनदा देण्यात आली. अण्णानि फोन केला माग मामीनी केला. मावशी झालीस तू. या एका वाक्याने सकाळ झाली होती.

या आनंदाच्या क्षणी मला नाही म्हंटल तरी गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या पहिल्या तारखेची आठवण झालीच. यास्मिनच्या बाळंतपनाची. यास्मिनच्या चिमुकल्याने ''खाला बननेका एहसास दिया था, पर मौका नही''..तिच्या बाळाची किती तरी स्वप्ने मी मनात साठवली होती. कोणाला हि याबाबत कल्पना नव्हती पन मनात होत्याच खुपश्या कल्पना. एक छोटासा जीव...बोबड्या बोलातून खाला म्हणून हाक मारणार, मी बडी खाला अन शिरीन छोटी खाला. सच अ नाईस फिलिंग. पण नियतीला ते मान्य नव्हते. आज हि तो दिवस आठवत आहे, रमजानचा महिना होता, आम्ही सगळेच जन रोजा सोडत होतो, यास्मिनला अचानक त्रास सुरु झाला अन तत्काळ तीला दवाखान्यात नेण्यात आले. आता आपण खाला बनणार याच विचारात मी अन शिरीन होतो. मगरीब, इशा, तरावीहची नमाज अदा केली अन प्रत्येक वेळी यास्मिनच्या वेदना कमी व्हायात अन बाळ सुखरूप जन्माला यावे यासाठी आम्ही दोघींनी प्रार्थना केली. कधीही बाळ जन्माला येवो, आम्हला कळवा असे मा-पपाना आधीच सांगितले होते, रात्री ३ च्या सुमारास फोन आला, बेटा हुवा है, पर कमजोर हे इसलिये भारती हॉस्पिटल मे कांच पेटी में रखना हे, सांस लेनेमे बच्चे को तकलीफ है..हि गोष्ट मा-पपाने त्यावेळेस अत्यंत शांतपणे आणि धीराने सांगितली होती. पण आज लक्षात येतंय त्यांनाहि त्यावेळेस किती त्रास झाला असेल. यानंतर खूप वेळ झोपच आली नाही, मुल जन्मले तर आहे पण त्याला जन्मताच त्रास. सहनच होईना, इतकासा जीव अन त्याला वेदना. कसली हि नियती. सकाळी रोजा धरण्यासाठी उठलो. अशा प्रसंगात मन हि आपल्या विरूद्धच उभे राहत असते. फोन येऊन गेल्यापासून कसले कसले विचार मनात येऊन गेले होते. शिरीनला काही वाटू नये म्हणून शांतपणे सगळे काही मी सुरळीतपणे करतेय असे दाखवत होते. रोजासाठी सहरी करायला लागलो, चपातीचा घास तोंडात टाकला अन तो पहिलाच घास मला इतका कडू लागला कि बास. त्यानंतर तो गिळेनासा झाला, तोंडातल्या तोंडात घास घोळत राहिला. येणाऱ्या भविष्याचे ते संकेत होते ज्याकडे त्या क्षणी मला अजिबात लक्ष द्यावेसे वाटले नाही. पुढचा घासच घ्यायची माझी हिम्मत होत नव्हती. पण शिरीन साठी मी पुढची अर्धी चपाती कशी बशी खाल्ली. घास तोंडातच घोळतोय हे खूप विचित्र होते. त्यानंतर नमाज पढलो अन आठवतय शिरीन खूप रडली होती, दुवा मागताना..त्या क्षनाला एकांत हवा होता अन आम्ही दोघीही सगळ छान होणारचा एक आशावाद स्वतासाठी जपत होतो. एकमेकींशी काहीही न बोलता आमचा दिवस सुरु झाला होता. द्विधा मनस्थिती होती, बाळ जगात येण्याचे आनंद करावे कि त्याच्या त्रासाचे दुख काहीच कळत न्हवते. त्याच्या बरे होण्यासाठी मा-पपांनी खूप काही केले. पैसा हि खर्च केला अन अगणित दुवा. शेवटी सात दिवस बाळ जगले. खर तर जगले कि नेमके काय झाले कसे ठरवायचे हे फ़क़्त अल्लाहला माहित. बाळाने एकदाही डोळे उघडले नाहीत. ज्या जगात येण्यासाठी त्याने नऊ महिन्याचा प्रवास केला होता. त्या जगाचे एखादे क्षन तरी डोळे उघडून दर्शन त्याला घ्यावेसे वाटले नाही..एक सप्टेबरला जगात आलेला माझा गोंडस भाचा ७ सप्टेंबरला या जगातून अलवारपणे निसटला होता. त्याला काचपेटीत ठेवल्याने बघण्याची सोय हि नव्हती. लहान मुलांना इन्फेक्शन लवकर होत असल्याने ठराविक वेळेत बाळाचे आई-बाबाच भेटू शकत होते. त्यामुळे त्याने ज्या दिवशी पूर्ण श्वास थांबवले त्या दिवशी त्याला घरात आणले होते. तेव्हाच बघयला मिळाले. हॉस्पिटलच्या एका पांढऱ्या शुभ्र वस्त्रातला तो हलका जीव दादीने एका जिवंत लेकराला आणावे तसे पोटाशी धरून आणले होते. त्या क्षणी मला गलबलून आले होते. सुबक चेहरा, टोकदार नाक, इवलीशी ओठांची पाकळी, चिमुकले हात-पाय, अन या सर्वांवर कायमचे मिटलेले डोळे. एवढा छोटा जीव अलगदपणे मातीत विलीन होणार हे सहनच होत नव्हंते. यास्मिनचा त्रास वाढू नये म्हणून रडावे की रडू नये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी घरात आलेला तो निपचित जीव तितक्याच शांतपणे घरातून बाहेर पडला. अवघे सात दिवस, पण मनात कायमचा राहिला..मी अन शिरीनने तर त्याचे नाव हि ठरवले होते. पण.....या पण च्या पुढे कुठे कोणाचे काय चालते.....

मात्र आज मी खूप आनंदी आहे. खूप..खूप..खूप..!! मला हे दुखाचे क्षण आठवले खरे पण यामुळे आनंदाच्या पातळीला अधिक गहिरा रंग मिळाला आहे. ताइचे बाळ हातात घेताना जे असीम सुख मी अनुभवलं ते मलाच ठाऊक.. तो नाजूक स्पर्श, छोटुकल्या चेहऱ्यावर अलगद पसरणारी स्मितरेखा, किलकिले डोळे करत आपल्याकडे पाहणाऱ्या ते नजरेतल कुतूहल...सगळच मस्त..एकदम ग्रेट..छान छानच..यास्मिनच्या बाळाला हातात हि घेता आले नव्हंते...त्याने त्याच्या अंकुरल्या क्षणापासून खाला होण्याचे दिवास्वप्न अन त्या प्रोसेसचा आनंद दिला होता. ताईच्या या चिमुरडीने तर मासी होण्याचा आनंद व कायमस्वरूपी संधी दिली आहे...गोड ब्लेस हर..अल्लाह उसको लांबी उम्र दे और ढेर सारी खुशिया...thank u dear to making me मां जैसी..मासी !!!!

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...