मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

कोणी आहे का ??

हॅलो.. हॅलो.. बोल ना काहीतरी.. गंमत सांगायचीय का.. अं..की मी सांगू? हॅलो..हॅलो.’ 
ताई नाहीतर दादा फोनच्या तोंडाशी ओरडत राहतात; पण पलीकडून काहीच ऐकू येत नाही. कुणी बोलतच नाही. नुसतीच नि:शब्द शांतता. कुठल्या तरी चिमुरड्याने नाहीतर चिमुकलीने केलेला हा फोन असतो खरा; पण ते बोलत काहीच नाहीत. खूप वेळ. असंच शांत. काहीसं वैतागत मग ही ताई-दादा ‘फोन ठेवतो’ म्हणतात तेव्हा पलीकडून नुसतीच चुळबूळ होते. शब्द अजूनही फुटलेला नसतो. कोंडलेल्या घशातून नुसतेच ‘अहं अहं’ आवाज येत राहतात. काहीवेळा नुसतीच मुसमुस. मग असं बर्‍याचवेळा झाल्यावर कुठल्या तरी फोनवर हे लेकरू खुलतं.. आणि मग समोर येतं हेलावून टाकणारं एक भीषण सत्य. 
..मग बोल. बोल म्हणून पलीकडल्या सानुल्या जिवाला खुलवण्याचा प्रयत्न करणार्‍या ताई-दादांवर गप्प राहण्याची, तोंडून शब्द न फुटण्याची वेळ येते. 
हे कुठले ताई- दादा?
घरातले नव्हेत.
ते बसतात मुलांसाठी ‘हेल्पलाईन’ चालवणार्‍या संस्थांच्या ऑफिसात. त्यांचे ना कुणाशी नाते असते ना चेहरा. त्यांना असतो फक्त ‘आवाज.’
पलीकडून फोन करणार्‍या घाबरलेल्या मुलाला/मुलीला समजून घेण्याची क्षमता. 
- आणि हो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते त्यांच्याकडे. 
मुलांशी मनमोकळ्य़ा गप्पा मारण्यासाठी, त्यांचं मन समजून घेण्यासाठी भरपूर वेळ.
.. पण मुलांच्या आई-बाबांकडे नसतो का आपल्या मुलांसाठी वेळ?
- नसतो बहुतेक.
म्हणून तर देशभरात सर्वत्र मुलांसाठी ‘हेल्पलाईन’ चालवणार्‍या संस्थांना वेळ पुरेनासा झाला आहे प्रश्न सोडवण्यासाठी, मदत मागण्यासाठी, शंका विचारण्यासाठी, मनातली गुपितं शेअर करण्यासाठी.. एवढंच काय, साध्या गप्पा मारण्यासाठीसुद्धा ‘हेल्पलाईन’चा नंबर फिरवणार्‍या मुलांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
’ ’
वय वर्षं अडीच असणारी श्रुती. तिची सकाळची शाळा. आई-बाबा दोघंही कामावर जातात. आजी-आजोबा श्रुतीबरोबरच असतात; पण आजोबा सतत आजारी आणि आजी त्यांचं करण्यात, बघण्यात थकून गेलेली. त्यामुळे ही चिमुकली स्वत:च्याच घरी एकटी पडली आहे. सोसायटीत तिच्या वयाचं कोणीच नाही, जे तिला खेळात सामील करून घेतील. परिणामी, तिला सारखं सारखं बोअर होतं. तिला विचारलं, ‘बोअर म्हणजे काय?’ तर उत्तरातही आळसावून सांगते, ‘शाळेतल्या गप्पा-गोष्टी ऐकायला कोणीच नाही ना!’
सात वर्षांच्या आर्यनला लघवीचा त्रास आहे. त्याला कायमच घाईची शू येते. शाळेत बाईंना विचारून टॉयलेटपर्यंत जाईपर्यंत आर्यनला चड्डीतच शू होते. मग त्याचा वास येतो. बाई रागवातात. आई मारते. मित्र खेळायला घेत नाहीत. पण असं का होतं? हा त्रास कसा टाळता येईल हे मात्र आर्यनला कोणीच सांगत नाही. 
अवघ्या पाचव्या इयत्तेत शिकणार्‍या सिमॉनला ‘टेन्शन’ येतं. तिला सतत ‘इनसिक्युरिटी’ वाटते, कोणी तरी आपल्यापुढे गेलं तर. आपल्याला कमी मार्क मिळाले तर. इतर कोणाचं कौतुक झालं की सिमॉनला त्रास होतो. जळजळ होते. प्रत्येक वेळी जिंकणं इतकं महत्त्वाचं नसतं, हरण्यातही मजा आहे हे तिला कोण सांगणार? 
अमित, सोना, सलमा, रॉनी, झुबेर, साशा, अक्षत, रजत या सर्वांना कॉम्प्युटर गेम आवडतात. काटरूनचं जग भन्नाट वाटतं. या जगातील क्लृप्त्या आणि एक्साईटमेंटची ही पोरं दिवानी आहेत. दिवसातले सहा-सात तास ती या जगात वावरतात. या ‘व्हचरुअल’ जगण्यात ही मुलं विसरून गेलीत खरे श्‍वास. खरा-खुरा खेळ आणि मग त्यातील दमछाक! मुलंदिवसभर घरीच असतात याचं मात्र पालकांना भलतंच समाधान.
आपल्याच कपड्यावरच्या लालसर डागांनी स्नेहा आणि राबिया या मैत्रिणी घाबरल्यात. आईनं फक्त इतकंच सांगितलं की, ‘याला ‘मासिक पाळी’ म्हणतात. ती दर महिन्याला येईल. तेव्हा लक्ष ठेवायचं, आपल्या कपड्यांकडे.’ यासंबंधी शाळेत एकदा लेक्चर झालंय; पण त्यातलं फारसं काहीच कळलं नाही. या दिवसांत कंबर इतकी जीवघेणी का दुखते? पायाच्या पोटर्‍या का जडशीळ होतात. मूड अचानक का जातो आणि मग आई का म्हणते, ‘संध्याकाळी बाहेर पडायचं नाहीस’ आईला उत्तर माहीत नाही म्हणून ती गप्प करते; पण स्नेहा, राबियाचा गोंधळ उडाला आहे. 
आजकाल पंधरा वर्षाच्या शशांकला चित्रपट पाहायचीच भीती वाटतेय. नायक-नायिका प्रेमाने एकमेकांशी बोलायला, एकमेकांना स्पर्श करायला लागले की, शशांकच्या आत खूप उलथापालथ होते. उत्तेजित झाल्यासारखं होतं. त्याची चड्डी ओली होते. त्याला ‘घाणेरडं’ वाटायला लागतं. आपण पापी वगैरे असल्यासारखं आणि आपल्याला भयानक काहीतरी झाल्यासारखं त्याला वाटतं. पण उत्तेजित होणं ‘घाणेरडं’ नसतं आणि ते स्वाभाविक असल्याचं कोण सांगणार? मुळात शशांकला याविषयी बोलायचं कुणाशी हेच कळत नाहीये.
शेजारचा दादा आला की छोटी सई आतल्या खोलीत धूम पळते. तिला तो दादा अजिबात आवडत नाही. तिला तो जवळ घेऊन सारखी सारखी पप्पी घेतो. तिच्या शरीरावरून नुसताच हात फिरवत राहतो. तिला हे घाण वाटतं. 
रेल्वेस्टेशनवर मिळणार्‍या ‘तसल्या’ नियतकालिकांच्या भोवती १२ ते १४ वयोगटातील मित्रांनी राडा केलाय. कॉम्प्युटरच्या दुनियेतून अश्लील साईट्समधून ‘नॉलेज’ वाढविण्यात मुला-मुलींना मज्जा येतेय. झोपडपट्टीतला रघू कोयत्याचा धाक दाखवून गुंडागर्दी करायला शिकलाय. अल्पवयीन शमाला तिच्या बापानेच विकलीय. तिला ‘त्या’वस्तीत नाही राहायचंय. रेश्माला मात्र इथे राहण्यात थ्रिल वाटतंय आणि ‘कमाई’पण भरपूर मिळत असल्याचं समाधानही.
हे सगळं वाचल्यावर गावाकडचे पालक म्हणतील, आमच्या मुलांना हे असले भलते सलते काही त्रास नाहीत, आमच्या मुलांवर एकट्या घराचंच नाही, तर गावाचंच लक्ष असतं.. ही ब्याद शहरातल्यांच्या नशिबी. 
शहरातील पालक म्हणतील हे ‘असलं’ घडायला महानगरातील पालकच जबाबदार. आम्ही अजून आमच्या मुलांशी संवाद ठेवून आहोत. 
महानगरातील पालक आणखी कोणाला दोषी ठरवतील. पण जरा थांबा. हे सगळे प्रसंग किंवा प्रश्न दुसर्‍या तिसर्‍या जगातील नव्हे, तर तुमच्या आमच्या घरातलेच आहेत. हे आमच्याकडे घडतच नाही, आमच्या समाजात होतच नाही, आम्ही काय बेजबाबदार वाटतो? पालक म्हणून असणारी कर्तव्यं आम्हाला कळत नाहीत का? असं म्हणून हात झटकू नका. प्रश्न नाजूक आहेत, हळुवार आहेत आणि तितकेच क्लिष्ट-किचकट! थोडसं थांबूयात, आपल्याच मुलांपाशी आणि समजून घेऊयात काय चाललंय या भावविश्‍वात..!!
’ ’
मुलांच्या विश्‍वातील असंख्य प्रश्न, असंख्य समस्या, एकाच समस्याचे असंख्य कंगोरे रोज रोज येऊन धडकतात १९0८ या चाईल्डलाईनवर. अडचणीत असलेल्या, शारीरिक-मानसिक कोंडमारा सोसणार्‍या मुलांच्या मदतीसाठी २000 मध्ये चाईल्डलाईन सुरू झाली तेव्हा पुण्यात महिन्याला हजार-दीड हजार फोन यायचे. त्यात कमालीची वाढ होऊन आता महिन्याकाठी १८ ते २0 हजार फोन येतात आणि कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती इतर सगळ्या गाव-शहरांची. चाईल्डलाईनवर येणार्‍या या फोनची संख्या थोडीथोडकी नाहीये. हजारांच्या अन् दशहजारांच्या घरातील ही संख्या अस्वस्थ करणारी आहे. पालक, नातेवाईक, शिक्षक, शेजारी-पाजारी अशी सगळी जिवंत माणसं आजूबाजूला असतानाही आपल्या मनातील उलघाल, खोलावरची एखादी जखम, एखादा प्रश्न किंवा अगदीच फालतू, महत्त्वशून्य असं काहीही मनातलं सांगण्यासाठी आपल्या मुलांना फोनवरच्या अदृश्य माणसाची गरज वाटावी याहून भयानक काय असू शकतं?
मोठय़ांसाठी संवादाची अमाप साधनं निर्माण होत असताना लहानग्यांना खर्‍या अर्थानं मोकळं होण्याची, संवाद करण्याची संधीच नाकारली जातेय. मुलं घुसमटू लागली आहेत. एकटी पडू लागली आहेत. 
पुण्यातील ज्ञानदेवी संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या चाईल्डलाईनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांच्याशी बोलताना मुलांच्या भेदरल्या जगाचं दार उघडतं आणि त्यातून भसाभस बाहेर पडणारे प्रश्न मन अस्वस्थ करतात.
’ ’
सहस्त्रबुद्धे सांगत होत्या की, फोन करून अनेकदा मुलं काहीच बोलत नाहीत. अशा ‘सायलेंट कॉल’चं प्रमाणही बरंच वाढलं आहे. मुलांना बोलायचं नसतं आणि फोनही ठेवू द्यायचा नसतो. विभक्त कुटुंबपद्धती आणि एकटं मूल यामुळे मुलांना भावंडं नसतात. पालकही नोकरी करणारे असतात. मुले पाळणाघरात असतात किंवा स्वत:च्याच घरात बंद. संवाद करायला कोणीच नाही. शाळेत शिकलेलं घरी ऐकायला कोणीच नाही. सुरुवातीला बोअर होऊ लागतं. एकटं एकटं वाटू लागतं आणि हळुवारपणे आपणच आपल्या मुलांना ढकलून देतो, एकाकीपणात. अशी मुलं फोन करतात तेव्हा त्यांना नुसतंच ऐकणारं कोणीतरी हवं असतं. आईने भाजी काय केली इथपासून ते ‘रिक्षावाले काका आले’ म्हणत निरोप घेईपर्यंत काहीही ऐकणारं कुणीतरी. 
अनेक प्रकारचे नैराश्य निर्माण होण्यासाठी हा एकटेपणाच कारणीभूत ठरतो. भीती वाटते, रडू येतं असं सांगणारे काही जण असतात, तर काहींना मानसिक आधार हवा असतो. घरात मिळू न शकणारं ‘इमोशनल बॉण्डींग’ मुले बाहेर शोधू लागतात. 
परीक्षेच्या काळात अभ्यासाची भीती, विषय न समजल्याची भीती वाटणारे असंख्य फोन येतात. दहावी-बारावीच्या परीक्षांचे टेन्शन, चांगल्या मार्काच्या अपेक्षांचं ओझं, मग करिअर निवडीचं टेन्शन. या स्पर्धेच्या युगात मुलांना, मुलांच्या क्षमतेला समजून न घेतल्याने लहान वयातच त्यांच्या मानगुटीवर टेन्शनचं भूत बसतं. काहीवेळा मग आत्महत्त्या करण्याचाही प्रयत्न होतो. त्यांच्याशी बोलून, जगण्याची उमेद निर्माण करून आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याचे कठीण प्रयत्न करावे लागतात. आई-बाबांचं नातंच तुटण्याचे प्रसंग हल्ली बरेच. अशा घटस्फोटित पालकांची मुलं. घटस्फोटामुळे भेदरून गेलेली असतात. त्यांना वस्तुस्थिती स्वीकारायला शिकवावं लागतं. मुलांना ज्यांच्याकडे राहायचं त्याचा कल घेऊन त्यांना तेथे पाठवावं लागतं. पालक कधीकधी मुलांना एकमेकांविरुद्ध भडकवत असतात. अशा परिस्थितीत मुलांची मन:स्थिती खूप अडचणीची होते. खरंखोटं कळत नसतं. 
वयात येताना मुलांना योग्य ‘लंैगिक शिक्षण’ न दिल्यानेही मुलांचा गोंधळ वाढलेला दिसतो. हे असं मलाच होतं का? हा प्रश्न त्यांना छळत राहतो. 
झोपडपट्टीतील मुलांच्या समस्याच निराळ्या!
त्यांचे पालकही राबायला इथंतिथं फिरत असतात. मुलं एकटी, स्वत:च्याच मालकीची झालेली असतात. शिक्षणाचा अभाव, व्यसनांची संगत आणि टग्या पोरांची साथ. यातून काही जण चोर्‍यामार्‍या शिकतात. 
वयात येणार्‍या या मुलांची मानसिक घालमेल तर इतर वर्गातील मुलांपेक्षा भलतीच निराळी असते. एकतर लहान घर-झोपड्यांमुळे या मुलांनी कधीकधी आपल्याच आई-वडिलांचे ‘रात्रीचे उसासे’ ऐकलेले असतात. काही जणांनी दिवसाढवळ्या काहींच्या ‘क्रिया’ही पाहिलेल्या असतात. ही मुलं फोन करून घाणेरड्या शिव्या देतात. अर्वाच्य बोलतात. काही जण तर ‘इन्व्हीटेशन’ही देतात. या मुलांना हाताळणं जोखमीचं असतं. सल्ले उपदेशाचे डोसही पाजलेले चालत नाहीत. त्यांच्या कलाने घेऊन त्यांना त्यांचा शारीरिक बदल समजून सांगावा लागतो. 
सध्या आपल्या देशात लैंगिक शोषण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. शाळेत, घरात मुलं स्वत:ला कुठेच सुरक्षित समजू शकत नाही, ही एक भीषण समस्या आहे. या शोषणाला बळी पडलेली मुलं आई-वडील, शिक्षकांपासून, नातेवाईक, शेजारी, अनोळखी अशा कित्येकांची नावं घेतात. दोन अडीच वर्षाच्या मुलीपासून ते अगदी सेरेब्ररल पाल्सी या मेंदूच्या आजारात जखडून पडलेल्या मुलींवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याच्या कित्येक घटना चाईल्डलाईनवर येतात. अशा प्रसंगानं मुलांची जगण्याची उमेद खचलेली असते. मुलं घुमी होतात किंवा काही जण ठार वेडीच होतात. लैंगिक शोषण हे झोपडपट्टय़ांमध्येच नाही, तर ते अगदी गर्भश्रीमंत, उच्चभ्रू घरातही होतं. मुलं आपल्याच घरात सुरक्षित नसणं याहून दुर्दैव नाही.
यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट महत्त्वाची असते ती ‘संवादाचा अभाव.’ मुलांशी संवाद झाल्यास, आपलेपणा निर्माण झाल्यास प्रत्येक मुलाचा प्रश्न सोडविणं सोपं होतं. 
.. तर ही अशी कहाणी.
अखंड बडबडणार्‍या मोठय़ांच्या कर्कश जगातल्या एकट्या, एकाकी पडलेल्या, गप्पगप्प झालेल्या, घाबरल्या मुलांची. उपासमारीशी लढणार्‍या बेघर मुलांचं सोडा, अगदी सधन कुटुंबातदेखील मुलांसाठीच्या सोयी-सुविधांनी घरं ओसंडून वाहत असताना त्यांना जवळ घेऊन चार शब्द बोलण्यापुरता वेळ मात्र कुणाजवळ नाही.
खाऊ- खेळण्यांच्या गर्दीत न्हाऊन निघणारी मुलं मनातून मात्र एकटी पडत चालली आहेत. भोवतीचं बदलणारं जग त्यांच्यापुढे नव्या प्रश्नांचं भूत नाचू लागलं आहे. काही समजत नाही. सुचत नाही. सुटत नाही. चार प्रेमाचे शब्द हवे असतात. धीर हवा असतो.. पण तो कुठे बाजारात विकत मिळतो?
म्हणून तर फोन उचलून हेल्पलाईनचे नंबर फिरवण्याची पाळी येते मुलांवर!
..तुम्ही जगात कुठे फिरत असाल, बीबी-आयपॅड-आयफोनबरोबर ‘बिझी’ असाल. चॅट विन्डोज अगर वेब कॅमसमोर बसलेले असाल, तर वेळात वेळ काढून जरा एकदा कानोसा घ्यायला विसरू नका. 
- तुमची वाट पाहून कंटाळलेल्या तुमच्या बछड्याने कदाचित घरातल्या जुन्या लॅन्डलाईनचा रिसिव्हर उचललेला असेल!

थांबूयात, आपल्याच मुलांपाशी आणि समजून घेऊयात काय चाललंय या भावविश्‍वात..!!
’ ’
मुलांच्या विश्‍वातील असंख्य प्रश्न, असंख्य समस्या, एकाच समस्याचे असंख्य कंगोरे रोज रोज येऊन धडकतात १९0८ या चाईल्डलाईनवर. अडचणीत असलेल्या, शारीरिक-मानसिक कोंडमारा सोसणार्‍या मुलांच्या मदतीसाठी २000 मध्ये चाईल्डलाईन सुरू झाली तेव्हा पुण्यात महिन्याला हजार-दीड हजार फोन यायचे. त्यात कमालीची वाढ होऊन आता महिन्याकाठी १८ ते २0 हजार फोन येतात आणि कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती इतर सगळ्या गाव-शहरांची. पालक, नातेवाईक, शिक्षक, शेजारी-पाजारी अशी सगळी जिवंत माणसं आजूबाजूला असतानाही आपल्या मनातील उलघाल, खोलावरची एखादी जखम, एखादा प्रश्न किंवा अगदीच फालतू, महत्त्वशून्य असं काहीही मनातलं सांगण्यासाठी आपल्या मुलांना फोनवरच्या अदृश्य माणसाची गरज वाटावी याहून भयानक काय असू शकतं?
पुण्यातील ज्ञानदेवी संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या चाईल्डलाईनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांच्याशी बोलताना मुलांच्या भेदरल्या जगाचं दार उघडतं आणि त्यातून भसाभस बाहेर पडणारे प्रश्न मन अस्वस्थ करतात.
’ ’
सहस्त्रबुद्धे सांगत होत्या की, फोन करून अनेकदा मुलं काहीच बोलत नाहीत. अशा ‘सायलेंट कॉल’चं प्रमाणही बरंच वाढलं आहे. मुलांना बोलायचं नसतं आणि फोनही ठेवू द्यायचा नसतो. विभक्त कुटुंबपद्धती आणि एकटं मूल यामुळे मुलांना भावंडं नसतात. पालकही नोकरी करणारे असतात. मुले पाळणाघरात असतात किंवा स्वत:च्याच घरात बंद. संवाद करायला कोणीच नाही. शाळेत शिकलेलं घरी ऐकायला कोणीच नाही. सुरुवातीला बोअर होऊ लागतं. एकटं एकटं वाटू लागतं आणि हळुवारपणे आपणच आपल्या मुलांना ढकलून देतो, एकाकीपणात. अशी मुलं फोन करतात तेव्हा त्यांना नुसतंच ऐकणारं कोणीतरी हवं असतं. आईने भाजी काय केली इथपासून ते ‘रिक्षावाले काका आले’ म्हणत निरोप घेईपर्यंत काहीही ऐकणारं कुणीतरी. 
अनेक प्रकारचे नैराश्य निर्माण होण्यासाठी हा एकटेपणाच कारणीभूत ठरतो. भीती वाटते, रडू येतं असं सांगणारे काही जण असतात, तर काहींना मानसिक आधार हवा असतो. घरात मिळू न शकणारं ‘इमोशनल बॉण्डींग’ मुले बाहेर शोधू लागतात. 
परीक्षेच्या काळात अभ्यासाची भीती, विषय न समजल्याची भीती वाटणारे असंख्य फोन येतात. दहावी-बारावीच्या परीक्षांचे टेन्शन, चांगल्या मार्काच्या अपेक्षांचं ओझं, मग करिअर निवडीचं टेन्शन. या स्पर्धेच्या युगात मुलांना, मुलांच्या क्षमतेला समजून न घेतल्याने लहान वयातच त्यांच्या मानगुटीवर टेन्शनचं भूत बसतं. काहीवेळा मग आत्महत्त्या करण्याचाही प्रयत्न होतो. त्यांच्याशी बोलून, जगण्याची उमेद निर्माण करून आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याचे कठीण प्रयत्न करावे लागतात. आई-बाबांचं नातंच तुटण्याचे प्रसंग हल्ली बरेच. अशा घटस्फोटित पालकांची मुलं. घटस्फोटामुळे भेदरून गेलेली असतात. त्यांना वस्तुस्थिती स्वीकारायला शिकवावं लागतं.
वयात येताना मुलांना योग्य ‘लंैगिक शिक्षण’ न दिल्यानेही मुलांचा गोंधळ वाढलेला दिसतो. हे असं मलाच होतं का? हा प्रश्न त्यांना छळत राहतो. 
झोपडपट्टीतील मुलांच्या समस्याच निराळ्या!
त्यांचे पालकही राबायला इथंतिथं फिरत असतात. मुलं एकटी, स्वत:च्याच मालकीची झालेली असतात. शिक्षणाचा अभाव, व्यसनांची संगत आणि टग्या पोरांची साथ. यातून काही जण चोर्‍यामार्‍या शिकतात. 
वयात येणार्‍या या मुलांची मानसिक घालमेल तर इतर वर्गातील मुलांपेक्षा भलतीच निराळी असते. एकतर लहान घर-झोपड्यांमुळे या मुलांनी कधीकधी आपल्याच आई-वडिलांचे ‘रात्रीचे उसासे’ ऐकलेले असतात. काही जणांनी दिवसाढवळ्या काहींच्या ‘क्रिया’ही पाहिलेल्या असतात. ही मुलं फोन करून घाणेरड्या शिव्या देतात. अर्वाच्य बोलतात. काही जण तर ‘इन्व्हीटेशन’ही देतात. या मुलांना हाताळणं जोखमीचं असतं. सल्ले उपदेशाचे डोसही पाजलेले चालत नाहीत. त्यांच्या कलाने घेऊन त्यांना त्यांचा शारीरिक बदल समजून सांगावा लागतो. 
दोन अडीच वर्षाच्या मुलीपासून ते अगदी सेरेब्ररल पाल्सी या मेंदूच्या आजारात जखडून पडलेल्या मुलींवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याच्या कित्येक घटना चाईल्डलाईनवर येतात. अशा प्रसंगानं मुलांची जगण्याची उमेद खचलेली असते. मुलं घुमी होतात किंवा काही जण ठार वेडीच होतात. लैंगिक शोषण हे झोपडपट्टय़ांमध्येच नाही, तर ते अगदी गर्भश्रीमंत, उच्चभ्रू घरातही होतं. मुलं आपल्याच घरात सुरक्षित नसणं याहून दुर्दैव नाही.
यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट महत्त्वाची असते ती ‘संवादाचा अभाव.’ मुलांशी संवाद झाल्यास, आपलेपणा निर्माण झाल्यास प्रत्येक मुलाचा प्रश्न सोडविणं सोपं होतं. 
.. तर ही अशी कहाणी.
अखंड बडबडणार्‍या मोठय़ांच्या कर्कश जगातल्या एकट्या, एकाकी पडलेल्या, गप्पगप्प झालेल्या, घाबरल्या मुलांची. उपासमारीशी लढणार्‍या बेघर मुलांचं सोडा, अगदी सधन कुटुंबातदेखील मुलांसाठीच्या सोयी-सुविधांनी घरं ओसंडून वाहत असताना त्यांना जवळ घेऊन चार शब्द बोलण्यापुरता वेळ मात्र कुणाजवळ नाही.
खाऊ- खेळण्यांच्या गर्दीत न्हाऊन निघणारी मुलं मनातून मात्र एकटी पडत चालली आहेत. भोवतीचं बदलणारं जग त्यांच्यापुढे नव्या प्रश्नांचं भूत नाचू लागलं आहे. काही समजत नाही. सुचत नाही. सुटत नाही. चार प्रेमाचे शब्द हवे असतात. धीर हवा असतो.. पण तो कुठे बाजारात विकत मिळतो?
म्हणून तर फोन उचलून हेल्पलाईनचे नंबर फिरवण्याची पाळी येते मुलांवर!
..तुम्ही जगात कुठे फिरत असाल, बीबी-आयपॅड-आयफोनबरोबर ‘बिझी’ असाल. चॅट विन्डोज अगर वेब कॅमसमोर बसलेले असाल, तर वेळात वेळ काढून जरा एकदा कानोसा घ्यायला विसरू नका. 
- तुमची वाट पाहून कंटाळलेल्या तुमच्या बछड्याने कदाचित घरातल्या जुन्या लॅन्डलाईनचा रिसिव्हर उचललेला असेल!
मुलं का अस्वस्थ आहेत?
संवादाच्या अभावातून वाढत चाललेला एकाकीपणा
लैंगिक छळ
वयात येताना निर्माण झालेले प्रश्न आणि चाळवलेली उत्सुकता 
अभ्यासाचं नको इतकं ओझं
बीडी, सिगारेट, व्हाइटनर, आयोडेक्स आणि अशा तत्सम अनेक नशा करणार्‍या पदार्थांच्या शोधात आणि व्यसनांमध्ये गुरफटलेलं आयुष्य
काटरून, कॉम्प्युटरच्या ई-व्यसन हवंहवंसं वाटणारं आभासी जगणं.
अल्पवयीन मुलींचा राजरोस व्यापार, देहविक्री
बालमजुरीला जुंपलेले चिमुकले हात
अनाथ बेघर मुलं
सनाथ पण घर सोडून पळून आलेली मुलं
१0९८
देशातल्या जवळपास सर्व राज्यांत १0९८ या क्रमांकाची ‘चाईल्डलाईन’ उपलब्ध आहे. अडचणीतल्या मुलांसाठी वर्षाचे ३६५ दिवस २४ तास या क्रमांकावर संवादाची सोय आहे. मुंबईतील रस्त्यावरच्या मुलांसाठी चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने १५ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही हेल्पलाईन सध्या देशभर काम करत आहे. शहर-जिल्ह्यातील स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही हेल्पलाईन चालते. 
सल्लागार समिती
चाईल्डलाईनचं काम, अडचणीतल्या मुलांची सुटका व मुलांना सल्ला - मार्गदर्शनासाठी मदत करण्यासाठी प्रत्येक शहरात शहर सल्लागार समिती असते. त्यात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा, महिला व बालकल्याणचे अधिकारी, कामगार आयुक्त, जिल्हा व महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, वाहतूक मंडळाचे प्रमुख, सरकारी हॉस्पिटलचे डीन, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, बालकल्याण मंडळाचे प्रतिनिधी, बीएसएनएलचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो.
अधिक माहिती - www.childlineindia.org.in

(लोकमत च्या रविवारच्या  मंथन पुरवणीत १३ नोव्हेंबरला कव्हर स्टोरी म्हणून प्रसिद्ध झालेला माझा लेख...)

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...