Wednesday, July 6, 2011

स्मरण-विस्मरण नात्यांचे


आपण मोठे होत जातो..वाढत जातो..या प्रवासात कित्येक माणसे आपल्याला भेटतात. नवी नाती जुळत जातात. हे सगळ खूप छान आहे. पण काही दिवसापासून एक नवीच गोष्ट लक्षात येऊ लागली आहे, काही नाती अजिबातच आपल्याला आठवत नाहीत...प्रवास सुरूच राहतो अन माणसे मात्र दिसेनाशी होत जातात..कामाच्या व्यापात असेल...नव्या माणसांच्या गर्दीत असेल, किंवा आणखी काय, कारण काय नेमके ठाऊक नाही पण मग हि जुनी नाती हरवतातच कशी अन कुठे? ज्यांच्यासोबत राहून आपण एखादा भूतकाळ जगलेलो असतो. आठवणीचा एक पटल निर्माण केलेले असते. हे सगळे पुन्हा आठवणेही खूप छान अन विलोभनीय असते तरीही पुढच्या प्रवासात त्यातील काहीच नसते, कुठेच नसते....हे सगळे कुठे लुप्त होत तर? काही नाती जी तुटणार नाही, विसरणार नाही असे वाटले होते..ते आता प्रयत्नपूर्वक ही फारसे आठवत नाहीयेत.कोणीतरी आपल्याला दुखावले म्हणून किंवा मनातून उतरल्यावर एखाद्याला विसरणे किंबहुना नकळतपणे विसरले जाने. वेगळे अन काहीच घडले नसताना, कसलेच कारण नसताना, अचानकपणे माणसे अन त्या सोबतची नाती विस्मृतीत जाने याचा काय अर्थ आहे. मला हे अगदी लख्ख आठवत आहे, आजोळातील, वडिलांच्या गावाकडील, मैत्रीच्या गुंफनातील काही नाती एकदमच विरून गेली आहेत...विस्मरणात गेली आहेत..


त्यादिवशी सहजच एका मावस बहिणीची आठवण झाली. लहानपणीच्या बहुतेक उन्हाळी सुट्ट्या तिच्यासोबत सहवासात घालवली आहेत. ती असणार म्हणूनच तर आजोळी जायचे..पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या बहिणीला तिच्या घरची आठवण येऊ नये म्हणून तीहि कायम काळजी घ्यायची..माया करायची..आजोळी येताना माझ्यासाठी घरच्या दुकानातून खाऊ, बिस्कीट घेऊन यायची...कोणाशी भांडणे झाली किंवा कोणी गमतीने जरी रागावले तरी माझी बाजू सावरायची..हे सावरताना कधी मी आठवणीने व्याकूळ झाले कि माझ्या डोळ्यातल पाणी पाहून तीचे हि डोळे भरयाचे..माझ्यापेक्षा मोठी असल्याने अन तसे लहान वयातच लग्न झाल्याने उन्हाळ्यच्या सुट्ट्यातील भेटणे कमी होऊ लागले..मग मी पत्र लिहायचे..तिला ते हि खूप आवडायचे तेही सगळ्यांना कौतुकाने सांगायची..पत्र परत वाचावेसे वाटतात इतक छान लिहिते...मग हळू हळू हे हि मागे पडले..तिच्या संसारात ती रमत गेली..मी माझ्या महाविद्यालयात..दरम्यानच्या काळात तिच्या अन माझ्या घरात म्हणून असे बरेच बदल झाले..ती माझ्या बहिणीची नणंद झाली..त्यानिमिताने हि काही बदल नात्यात झाले..


हे सगळ आठवताना लक्षात आल कि लहानपणीच्या आठवणी वाढल्याच नाही..त्यात भरच पडली नाही..rather कित्येक दिवसातून ती माझ्या स्मृतींच्या कोणत्याच कक्षेत नव्हती..किंवा नाहीये..का अस?? नात्याचे मूळ इतके तकलादू होते का कि ते सहज उन्मळून पडावे. मला तिची आठवण नाही तसच तिचे हि असावे? तिचेही ना मला कधी काही फोन आहे ना माझ्यासाठी कधी कोणता निरोप असतो..माहित नाही कदाचित माझ्यासारखे नसावे हि. तिला फ़क़्त आठवण मांडता आली नसेल, सांगता आली नसेल असे हि झाले असावे...


पण परवा पासून हा प्रश्न मला छळत आहे, मी बदले आहे कि नातीच बदलीत. अक्षरशः जे लोक मला आता फारसे आठवतच नाहीत, आठवण यावे असे हि वाटत नाही किंवा आठवणीने चालू आयुष्यात काही फरकच पडणार नाही अशी स्तिथी आपल्यासोबत का घडावी.. नात्यांचे हळवेपण त्याच्या घट्ट रुतलेल्या मुळात असते तेच इथे कुठे हि जाणवत नाही..हे त्रासदायक आहेच पण हे घडलच कसे हे कळत नाहीये..हे एक उदाहरण झाले कोणास ठाऊक स्वताला समोर घेऊन बसले तर अशी अनेक नाती, माणसे सापडतील ज्यांना मी केव्हांची मागे टाकलीत मलाही माहित नसावीत..या विचाराच्या कल्पनेचीही भीती वाटतेय पण...


आपण असे अन इतके बदलत जातो का?? काय असते हे?? कि नात्याची डेप्थ अन त्यावरचा गाढा विश्वास इतकाच होता..ती असली काय अन नसली काय काहीच फरक नाही...कोणाच्या असण्या अन नसण्याने कोणाचे जगणे अडत अन्ही ते तत्व ऐकायला खूप छान वाटत असले तरी प्रत्यक्ष जगताना माणसाला समाज, नाती, गोतावळा लागतोच लागतो. मग तरीही असे का होतंय..??? प्रश्च प्रश्न. उत्तर किमान माझ्या जवळ तरी नाही....अन असे उत्तर नसणे हि खूप अगतिक करणारे असते..खूपच.!!!

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...