सोमवार, २५ एप्रिल, २०११

नावु डेज आय हेट द वर्ड लव.....!!!!!!











आय हेट द वर्ड लव.....!!!!!! हिनाला वेड लागले असे वाटते का???




प्रेम..एक आनंददायी शब्द, भावना...आयुष्यात आपल्याला प्रेम नक्की का हव असत हे कोणालाही नीट सांगता येणार नाही पण प्रेम प्रत्येकाला हवे असते यात शंका नाही. परवा सहज फेसबुक पाहत होते. सध्या फेसबुक वरूनच खास करून मित्र मैत्रिणीच्या आयुष्यात काय चाललाय हे कळत...हे इतकी सोशल साईट सोशल झाल्या आहेत.

फेसबुक्वर एका मैत्रिणीचा तिच्या भावी नवऱ्या बरोबरच छानसा फोटो अपलोड केलेला होता. आणि त्यावर खूप छान कॉमेंटहि दिसत होत्या..किती छान आहे हा फोटो..जोड़ी छान आहे....कुठला आहे ग तो...काय करतो इथपासून ते ढीग भर शुभेच्छा आणि चौकश्या...मी तो फोटो पहिला आणि का कोणास ठाऊक मला अगदी मळमळल्यासारखे झाले..उगीच अस्वस्थ झाले आणि मनात एक चटकन विचार आला बहुदा नाऊडेज "आय हेट द वर्ड लव...'' तो फोटो पाहून मन विश्षण झाले...अगतिकता आली अणि रित्या मनाची प्रेम ही आस किती तकलादू असू शकते असेच वाटले...

मैत्रीण ही प्रतिनिधिक आहे...आज काल असे सरसपणे पहायला मिलते...आणि नाही म्हंटले तरी त्रास होतो ....खर तर तिच्या खाजगी आयुष्या विषई बोलण्याचा मला अधिकार नाही अणि नैतिक दृष्टया ते योग्य ही नाही पण मनात आलेले उत्स्फूर्त विचार सोडून ही द्यावेसे वाटत नाहीये....किम्बहुना या सगळ्या गोष्टी मुले प्रेम ही भावना मनातून उतरत चालली आहे...

माझ्या या मैर्त्रिनिचा एक खास मित्र होता..कोलेजमधे दोघांचे प्रेम जुलले होते...दोघांचे एक्मेंकवर नितांत प्रेम होते...कोलेजच्या पद्विचे हे प्रेम पद्वियुतर पद्विला अधिक खुलत गेले...दोघे आकंठ प्रेमात बुडालेले होते...हेवा वाटव इतक प्रेम...घरी कलाल....घरच्यानी समंजस्पने घेतले...परवानगी मिळाली...मेड फॉर इच आदर, सर्व छान होते...मग अभ्यास संपला..सगळे विखुरले...नोकरीच्या वाट्याला लागले...वर्ष दिड वर्ष झाले आणि एक दिवस मैत्रिणीने सांगितले..तिने त्याला नकार दिला..धक्काच बसला...त्याला सतत पुश अपची गरज आहे...सारख कोणी ना कोणी लागते...आयुष्यभर कसे चालेल हे...मग विचार केला अणि नकार सांगितला ...किती तरी वेळ या धक्क्यातून सावरता आले नाही आणि आखा दिवस मलाच सूतक असल्यासारखे मी वावरत होते...उत्तरासाठी ती माझ्याकडे पाहत राहिली होती पण मीच डोळे मिलावु शकले नाही, उत्तर काय देणार...

असाच एक प्रसंग एका मैत्रिणीने सांगितला होता या मैत्रींचा एक मित्र होता...त्याची एक गर्लफ्रेंड होती...एकमेकांशिवाय जरा ही करमायच नाही...हा मित्र तर ती सोबत असली की जग विसरायचा, इतका की रस्त्यात तिच्यासोबत असतना हा कोणाला ओळख ही नाही द्याचा..गर्ल फ्रेंडला मैत्रिण माहित होती तरी हा कोण तू असा लुक द्याचा...जीवापाड प्रेम करायचा...त्याचा घरी विरोध नव्हता अणि तिच्या घरचा विरोध याच्या सुस्वभावने, कष्टलू प्रव्रुत्तिने आणि त्याच्या अत्यंत बुद्धिमत्ते पुढे तोही मवालाला होता....त्याची गर्लफ्रेंड शिकायला एक मेट्रो सिटीमधे गेली...तिथल्या चकचकीत जगण्याला भुलली...एक श्रीमंत मुलगा तिला भेटला..त्याचया महागड्या गिफ्ट्स ने हिचे मन जिंकले..अणि जे व्हयाचे तेच झाले... त्याने तिला विचारले आणि हिने त्याला होकर दिला...हा सगला प्रकार सांगताना एका लहान मूल सारखा तिचा मित्र रडला होता....

माझा एक मित्र आहे...त्याला कोलेजमधिल एक मुलगी जाम आवडायची....तिला ही तो आवडायचा...कोणी तरी पुढाकार घेतला अअणि बंध जुलले...दोघे खुप भांडायचे, पण ते जगासाठी..फ़क्त ते असायचे तेव्हा छान रमलेले असायचे..एम् ऐ होईपर्यंत सर्व छान होते...मग करियर सुरु झाले आणि हा तिला टालू लागला...फोन नाही..बोलने नाही...भेटने नाही...हो आणि नाही च्या मधे ती अडकत चालली होती...त्याच्या पलिकडे कोणाचाही विचार करायला ती धजावत नाही आणि तो ठाम होकर-नकार- देईना...दोलकायमान अवस्था...तो पुरेसा तिच्यापासून लांब गेले हे आम्हला कळतय..तिला ही ते कळतय पण पटत नाही...यथाअवकाश पाहण्याचे कार्यक्रम सुरु झाले आणि ती बैचेन...तिने एकदाचा घरी लग्नच न करण्याचा तिचा निर्णय सुनावाला...घरात खुप काही झाले पण ती निर्णय सोडेना...नाते लादनार तरी कसे...त्याने आजपर्यंत नाही-हो चे नीट उत्तर दिलेले नाही...तिची उणीव झाली की फोन करतो..भेटतो ही...तीही निश्पापपणे भेटते...पण प्रेम आणि लग्न मात्र तिच्या मनातून पार मरून गेले..त्याच्या या तिचा आजही जीव आहे पण त्याने परतावे अस नाही वाटत तिला इतकी शुष्क झाली आहे ती....

असाच एक जन..आपली खुप कालजी करतो हे ओलखून त्याचया मैत्रीने लग्नासाठी विचारले..तो नाही म्हणाला...कारण न देता..मग मैत्री कायम केलि पण यानंतर कधी ती दुसरया मित्र-सहकारी बरोबर दिसली की त्याला अस्वस्थ व्हयाचे...कधी दुखी, कासाविस झाला की रात्रि अपरात्री ही याला तिच्याशी बोलाय्चेच असायचे...तिची कालजी घेणे त्याने अद्याप ही सोडले नव्हते...मग एक दिवस त्याने कबुल केले मला ही तू आवडतेस पण व्यवह्राच्या पातल्यावर तू नाही खरी उतरत...तू गोड आहेस पण व्यव्हार ज्ञान नाही तुला....ती हबकलीच...इतक kalun गुंतत गेली..तो कालजी करत राहिला...अन तिचे गुन्ताने ही वाढले...तो लग्न करतोय आता...

प्रेम आणि इमोशन यांचा सरल चुराडा...यातील प्रत्येक जन व्यवहरासाठी जगले...प्रेम मिळून ही त्याचा आदर करु ना शकणारे.... हे सगळे पाहिले की कसेतरीच होते..प्रकटिकल जगन्याच्या घोळत आयुष्याचा मेळ घालायला मात्र चुकले..आणि इमोशन चा मात्र गला दाबला....प्रेमाशिवाय,,आपल्या अंतर्मनातिल भावनाशिवय व्यवहारी जगने इतके महत्वाचे असते का..एक तर आयुष्य फुकटात मिळालेले .... आशा वेळी कोनातरी मनापासून जीव लावणारया सोबत चालायचे की अस कोडगे होत ढकलयाचे...अजीब हे..मला यातले नीट काही कळत नाही...एक तर मी मेंदू इतकेच मनाला महत्व देते...आणि मनाला जे कळत ते मेंदुला नाही कळत हे ही मला पटत..पण असे जगात दिसत नाही त्यामुले आज काल आय हेट द वर्ड लव....!!!!!!!!!!!!!!!!

रविवार, २४ एप्रिल, २०११

वळवाचा पाऊस


पिवळसर संध्याकाली उन उतरताना,
सूर्य जरा ढगांच्या आडोश्याला गेलेला असताना
गच्चीच्या दारातून दिसणारा वळवाचा पाऊस
वाऱ्यासंगे येणारा मोगऱ्याचा सुगंध
पलीकडे गुलमोहराची लाल-पिवळसर-गुलाबी डुलणारी फुले
अल्लाहशी सवांद साधत जपमाळ घेऊन बसलेली मा
आकाशाशी कि स्वताशीच गुज करत बसलेले पपा
या हुरहुरणाऱ्या क्षणी मोठी होऊ लागलेल्या
लहान बहिणीच्या येरझाऱ्या
शांत निवांत वाहणारा वारा..रिमझिम पडणारा पाऊस
अन माझ्या डोळ्यापुढे उभी राहत जाणारी मां-पपाची शांत मुद्रा...



................

पिवळसर संध्याकाळी उन जरा उतरताना
सूर्य हि जरा ढगांच्या आडोश्याला गेलेला असताना
मन सैरभैर होते अन मलाच मी जडशीळ होते....

शनिवार, २३ एप्रिल, २०११

डोळ्यांच्या डोहात


डोळ्यांच्या  डोहात
मन गहिवरते
गहिवरल्या मनात
तुझी आठवण येते
आठवणीने व्याकूळ
मी अस्वस्थ होते
अस्वस्थ श्वासांना
तुझ्या विरहाची साथ येथे
साथीला माझ्या आणिक
तुझे डोळे राग भरलेले
भरलेला कंठ माझा मात्र
तुझ्या ओठांवर अबोलीची फुले
अबोला तुझा न समजे मला
अन प्रीत माझी न उमजे तुला
तुझवरच जडली प्रीत सख्या रे
अन प्रीतीत तुझी मी वाट पाहते
वाटेवर या बैचेन होऊनी
तुला आर्त हाक देते
हाकेसरशी फिरव तू पाठ
असशील जेथे तू सख्या रे
सख्या सांज वेळ
ढग ही जमलेत
बरसन्या आधी (ढग अन डोळे )
विरहाची येथेच पुसून टाक रेघ रे.....!!!!

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...