गुरुवार, १० मार्च, २०११

त्या सगल्या जराश्या वेगळ्या....

कार्यक्रमात आज गेले होते, स्वयंसिद्धा नावाच्या पुरस्कार वितरणाला. कार्यक्रम खरच खूप टची होता.. जगण्याची लढाई खंबीरपणे जगलेल्या ११ महिलांचा सत्कार इथे झाला. यावेळी प्रत्येकीची एक कहाणी होती..गांजलेल्या परिस्तिथीशी झुंजार सामना केलेल्या एका पेक्षा एक कहाण्या...माझे डोळेही नकळत ओलावले...किती तरी दीपशिखा आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि कितीतरी प्रेरणा त्या देत असतात तरीही आपल्याला आपले जगणे सगळ्यात अवघड आणि संकटांनी भरलेले का वाटत असते??

एक बाई होत्या..मुल होणार नाही असे निदान झाल्यावर त्यांनी एक १५ दिवसाचे मुल दत्तक घेतले होते. ६ महिन्यांनी कळले कि तो मुलगा मतीमंद आहे. दत्तक घेतलेले मुल मतीमंद असण्याचा हा केवढा मोठा धक्का होता. बाई खचल्या नाहीत. अनेकांनी सल्ला दिला मुल परत देऊन या. मतीमंद मुलगा म्हणजे केवढे करणे आले पण मातृत्व सर्व परीक्षा खंबीरपणे पास होतेच. बाईंनी आपले मुल आपले आहे आणि त्याला आपली गरज आहे हे ओळखले. आपल्या हृदयात अपार माया आणि प्रेम आहे आपणच या मुलाचा योग्य सांभाळ करू शकतो म्हणून हे मुल आपल्या पदरात आले आहे. तेव्हा मुलाचा सांभाळ करायचा निश्चय पक्का झाला आणि गेल्या २३ वर्षापासून त्या वाढत्या वयातील एका मुलाचा सांभाळ करत आहेत. तो मुलगा हि कार्यक्रमात उपस्थित होता..त्याला पाहून नकळत त्या माउलीपुढे मन नम्रपाने झुकले गेले..

सविता कुंभार नावाची अशीच एक दीपशिखा.. ४ वर्षाची मुलगी होती, तेव्हा पतीचे निधन झाले. पती रिक्षा चालक होते. सविताने तीच रिक्षा हातात घेतली. संकटाचा पाठलाग होताच सोबतीला. ती चालक परवाना काढायला गेली तेव्हा बाई आहे म्हणून तिला सांगण्यात आले कि संध्याकाळी ६ नंतर रिक्षा चालवायची नाही...तिने ते मान्य केले आणि रिक्षा हातात घेतली. रिक्षाच्या डिकीत ४ वर्षाचे लेकरू घेऊन सविताची परिक्रमा सुरु झाली. सुरवातीला आलेल्या अनेक संकटांनी तिला खूप शिकवले..धडे दिले...ती खंबीर होत गेली अन घडत ही. आज तिने एक व्हन घेतली आहे. शाळेतील मुलांची ने आन करते. आज गमंत म्हणजे शाळेतील मुले या अशिक्षित सविताला त्यांची प्रोग्रेस बुक दाखवतात अन गमंत म्हणजे तीही त्यात न वाचताच गुड गुड म्हणते.



याच कार्यक्रमात तळवलकर यांनी एक आठवण सांगितली. चौकटराजा चित्रपट दरम्यानची. चित्रपटासाठी कामायानीत शुटींग सुरु होते. त्यावेळेस विविध केसेस तेथील प्रमुख उलगडून सांगत होते. एका ३०शितिल महिलेचा एक ४-५ वर्षाचे मतीमंद मुल होते. तिच्या निधन झाले होते. त्यमुळे संपूर्ण आयुष्य तिने एकटीने काढणे तिच्या घरातल्याना रुचत नव्हते. डोंगर एवढे मोठे आयष्यात एक जोडीदार असल्यास जगणे अधिक चांगले होईल या साठी तिला सर्व जन गळ घालत होते. एक गृहस्थ तिच्याशी विवाहाला तयार होते. त्यांची अट एकाच होती कि तिने मुलाला वसतिगृहात ठेवावे. बाकी त्या मुलाची सगळी आर्थिक जबाबदारी तो घ्याला तयार होता. मुल जर घरी राहिले तर ती कायमच आई बनून राहील अशा परीस्तीथित ती बायको कधी होणार? गृहस्थांचे म्हणणे अगदी खरे आणि नैसर्गिक होते. त्यामुळे तिच्यावर त्या पद्धतीने दबाव आणला गेला आणि तिने मुलाला कामायानीत ठेवले. ज्या दिवशी ते मुल दाखल झाले त्या दुसर्या दिवसापासून कामायानीतील घड्याळ चोरीला जाऊ लागले. हातावरच, भिंतीवरचे घड्याळ गायब होऊ . याचा शोध घ्याचे ठरले आणि लक्षात आले या ५ वर्षाच्या मुलाच्या गादी खाली सगळे घड्याळ आहेत. हे पाहिल्यावर तेथील व्यवस्थापकांनी त्याच्या आईला बोलावून घेतले आणि सांगितले तू एकतर मुलाला विसर आणि संसारच कर किंवा मग तू पूर्णपणे संसार करण्याचा विचार सोडून दे आणि मुलाला सांभाळ कारण त्या मुलाला आईच्या कुशीत झोपायची सवय होती...ती धड धड ऐकू येत नव्हती म्हणून तो अशी चोरी करू लागला होता आणि जर आई मध्ये भेटत राहिली तर त्याला आणखी त्रास होईल..बाईपण आणि आईपण पणाला लागले होते.तिने निर्णय घेतला तिने तिच्यातील bai pan अणि आइपन दोघाना जपले. लग्न केलेच नाही अणि फ़क्त आई म्हनुन रहायचा तिने निर्णय घेतला. ती एक बाई होती मन्हून च ती हे करू shakli होती...

यांसारख्या दीपशिखा जगण्याचा वस्तुपठ्च देऊन जातात...अल्वारपने..कन्खार्पने अणि अत्यंत धीरोदात्त शांतपणे मनात या सगल्या जनि हलुवारपने जून बसल्या...कार्यकर्म सपऊँ बातमी लिहिताना ही मी खुप भावुक झाले होते...कधी कधी आपन असे एकदम अंतर्मुख, शांत का होतो याचे नेमके उत्तर देता येत नाही पण असे काही झाले की असवाथ वयाला होते इतके नक्की.

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...