रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०

परवानाचा प्रवासकाल रात्री परवाना हे पुस्तक संपवले तेव्हा मनावर एक प्रकारची उदासी घर करून होती. खरं तर पुस्तक वाचतानाही असह्य वेदना आणि त्रास होत होताच. एका 9-10 वर्षाच्या मुलीचा जीवघेणा, भूकेला आणि संघर्षाच्या अत्यंत दुखावणारा हा प्रवास...म्हणजे परवाना. अफगाणच्या तालिबान राजवटीत जीव मुठीत घेऊन अम्मीला शोधायला निघालेल्या तिच्या दुर्दम्य आशेचा हा प्रवास म्हणजे परवाना....तालिानी संघर्षाला समोरे जाण्यासाठी केस कापून मुलगा झालेली मुलगी म्हणजे परवाना...
डेबोरा एलिस या मुळ इंग्रजी लेखिकेचा ‘परवानाज् जर्नी’ या पुस्तकाचा अर्पणा वेलणकर यांनी अनुवाद करून आपल्याला खूप काही दिलेले आहे. पुस्तक मुळातच कुठेही अनुवाद वाटत नाही. इतकं जिवंत चित्रण आणि लेखनं.
परवाना या प्रवासात पहिल्यांदा तिच्या वडिलांना गमावते आणि तिथंपासून तिच्यापुढे असंख्य यातनांची सुरूवात होते. लहानपण विसरून जाऊन अवेळीच मोठं व्हायला लावणार्‍या परिस्थितीचा आपल्याला जितका राग येतो तितकाच तिच्याविषयी करूणा मनात जागी होत जाते. दिवस ड्ढरात्र, उजेड -अंधारात एकाकी प्रवास करणार्‍या परवानाच्या धाडसाचे कौतुक वाटत राहते. बॉम्बस्फोट आणि घरघरत्या विमानाच्या आवाजात तिच्यातील कोवळेपण विरत जात होते आणि तरीही परवानाचे खंबीर आणि आशावादी जगणं आपल्यालाही प्रेरणा देत राहते. वाटेत तिला 8-9 महिन्याचा एक लहान जीव सापडतो. नंतर असिफ आणि मग लैला. सगळे असेच बेवारस.
पोटात उठणार्‍या भूकेचा डोंब विझवताना या लहानग्याची इतकी दमछाक होत असते की कधी ते नासलेले पाव, आंबलेला भात, हिरवट गवत आणि परवानाच्या प्रिय अब्बुंच्या पुस्तकातील पानेही खातात. हे सगळं वाचाताना असह्य होतं आपल्याला. परवाना जेव्हा वडिलांच्या थडग्यावर दगडे ठेवते आणि विचार करते, ‘पैश्यांसाठी आपल्याला वडिलांची हाडे कोणी नेणार नाहीत आता.’ तिच्या आयुष्यातील या प्रसंगाने हादरून निघतो आपण. खूप अस्वस्थ होतो. त्यावेळचं तिचं रडणं तर त्याहून जीवघेणं वाटतं.
पुढे सामान खूप जड झाले म्हणून अब्बुची दोन जाड पुस्तके ती खड्डा खणून त्यात पुरते आणि विचारत करते की, अब्बुंना आता पुस्तके मिळतील वाचायला तर ते नक्कीच आनंदतील. तिचे निरागस भाव आणि कल्पना मनाला चटका लावून जातात. एव्हाना परवानाचे केस बरेच वाढलेले असतात आणि तिने घातलेले कपडेही लैलाच्या अम्मीचे असतात. पुढे ते एका रिहॅब कॅम्पमध्ये पोहचतात. प्रचंड थंडीने आणि भूकेने बेजार असतात त्यावेळेस, एक पुरूष तिच्यावर डोळे वटारून म्हणतो, तोंड झाक. झाकून घे तोंड. बाई आहेस ना तू.अशी उघड्या तोंडाने फिरतेस शरम नाही वाटत? परवानाच्या मस्तकात तिडीक जाते आणि ती स्वत:शीच पुटपुटते, ‘तोंड झाकून घे म्हणजे? कशाने झाकायचे तोंड? एखादी फाटकी तुटकी गोधडी असती तर तोंडच काय थंडीने कुडकुडणारं अख्खं शरीरचं नसतं का घेतलं झाकून?’ तालिबानी किंवा कट्टरपंथीयांच्या या विसंगत वागण्याचा वाचकालाही जाच वाटतो.
तालिबान्यांच्या या असमातेल वागण्याची परवानाला आता सवयचं झालेली असते पण सतत पोटात पडणारी आग या मुलांना खूप छळत राहते,हे स्पष्ट करणारी आणखी एक उदाहरण म्हणजे लैला. याच भूकेपोटी ती सुरंगांंच्या शेतीत शिरते आणि तिचा मृत्यू होतो. ही घटना तर चटका लावते. पुस्तकाच्या या टप्प्यावर तर आपल्या कोरड्या पडलेल्या मनालाही चरे जातात आणि डोळ्यातून वाहत राहतात अश्रू. पुस्तकाच्या शेवटाकडचा हा प्रवास इतका त्रास देऊन गेला की बास.....!!
परवानाचा आणि तिच्या सोबतीचा हा जीवघेणा प्रवास जीवनाची आवड असणार्‍या प्रत्येकाने वाचाच!! हे पुस्तक मराठीत आणण्यासाठी अपर्णा वेलणकर यांना खूप धन्यवाद.

--

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...